Letest News
विखेंना जरांगेंचा थेट इशारा ‘तूच मराठ्यांचं वाटोळं केलं!’‘अंतरवालीला तुला कोणी बोलावलं?’ जरांगेंचा व... राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत आस्पायर कुस्ती संकुलचा दबदबा!मालेगावच्या सर्वच पैलवानांची विजयी कामगि बाबांवरील विश्वासाने ‘अशक्य’ शक्य १५०० साईभक्तांची संकल्पपूर्ती यात्रा यशस्वी-पैशापेक्षा भाविकांचे ह... ““‘लिस्टवर येऊ नका’ गुन्हेगारांना एसपींचा थेट तडीपारीचा इशारा!” पोलिसांच्या लिस्टवर आलात तर तडीपार क... शिर्डीत मध्यरात्री संशयास्पद हालचाली दुचाकीसह दोघे पोलिसांच्या जाळ्यात! संकटात साई संस्थान ठरले आधारवड!कर्मचाऱ्यास अपघात विम्यापोटी साडेतीन लाखांची मदत पर्युषण महापर्वानिमित्त जिल्ह्यातील कत्तलखाने मांस विक्री केंद्रे बंद जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया य... चाकूचा धाक दाखवून तरुणीला घेऊन पसार! भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण रोशन घेगडमलसह दोघांविरुद्ध तक्रार प्रवीणभाऊ आल्हाट यांची मानवाधिकार असोसिएशनच्या अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती थरावर थर… कौशल्याचा कहर! शिर्डीत सनमित्र-क्रांतीच्या दहीहंडीचा पुन्हा एकदा जल्लोष
अ.नगरक्राईम

शिर्डीत दोन वेगवेगळ्या घटनेत दोन साईभक्त महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने धूम स्टाईल लंपास! धूम स्टाईल चोऱ्या वाढल्या!!

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी मध्ये व परिसरातही धूम स्टाईल महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून चोरी करण्याचे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. शिर्डीत नुकतेच असे प्रकार घडले आहेत.
भुसावळ येथील नेहा रविंद्र इंगळे या साईभक्त महिलेने शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की,दि. 13/12/2024 रोजी सायंकाळी 06/30 वा.चे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

सुमारास मी व सिद्धान्त राजु जोगदंड असे दोघेजण श्री साईबाबा समाधी मंदीर शिर्डी येथे दर्शनाकरीता आलो व हॉटेल क्लासीओ स्वीट्स या ठिकाणी थांबलो होतो. व तेथून रिलायन्स मॉल मध्ये खरेदी करून रात्री 08/30 वा. च्या सुमारास मनमाड ते नगर रोडने ट्रॅन्डस मॉल शेजारी पंचरच्या दुकानाजवळून मी व सिद्धान्त राजु जोगदंड असे साईबाबा मंदीराकडे पायी जात असतांना अचानक आमचे पाठीमागुन दोन इसम मोटारसायकलवर आले व त्यातील पाठीमागे बसलेल्या काळ्या रंगाची जॉकेट घातलेल्या इसमाने तोंडाला रुमाल बांधलेला होता

माझ्या गळ्यातील चाळीस हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन ओढून घेऊन गेला. तेव्हा माझ्या चैन मधील पॅन्डल खाली पडले परंतु लाईट गेली असल्याने आम्हाला त्या मोटारसायकलचा नंबर दिसला नाही. ते भरधाव वेगात पुढे निघुन गेले. तरी‌ माझी अनोळखी दोन चोरट्याविरुद्ध कायदेशिर फिर्याद आहे. या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर682/ 2024 नुसार भादवि कलम 3(5)/309(4 )प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

त्याचप्रमाणे
बेंगलोर येथील महिला साई भक्त त्रिवेणी मंजीनाथ गुप्ता यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की,दि. 12/12/2024 रोजी सायंकाळी 07/30 वा.चे. सुमारास आम्ही बेंगलोर येथुन रेल्वेने शिर्डी येथे साईबाबा समाधी मंदीरचे दर्शनासाठी निघालो. व दि. 13/12/2024 रोजी दुपारी 02/30 वा. आम्ही कोपरगाव येथे उतरून शिर्डी ला आलो. व कर्नाटका भवन शिर्डी येथे मुक्कामी थांबलो होतो. दि. 15/12/2024 रोजी पहाटे

03/30 वा. चे. सुमारास श्री साईबाबा समाधी मंदीर चे दर्शनासाठी कर्नाटका भवन येथून मंदीरात गेलो व दर्शन झाल्यानंतर 07/30 वा.चे. सुमारास मी व माझे पती मंजीनाथ सत्यनारायण गुप्ता, व आमच्या सोबत दर्शनासाठी आलेले कोनामा, सुनितामा असे आम्ही शिर्डी ते पिंपळवाडी रोडने जात असतांना दत्तनगर जवळ अचानक एक मोटारसायकल येऊन थांबली व त्यातील त्यावर पाठीमागे बसलेला इसम खाली उतरला व त्याने माझ्या जवळ येऊन माझ्या पाठीमागुन येऊन माझ्या गळ्यातील तीन तोळ्याचे सुमारे

90 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र बळजबरीने ओढूणतोडून चोरून घेऊन गेला. अशा आशयाची फिर्यादी वरून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 685 भादवि कलम 3 (5)/ 30 9 (4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही घटनेचा तपास शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button