Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
अ.नगरराजकीय

गांधी भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता भट्टाचार्य

अभिजित भट्टाचार्य सध्या एका वेगल्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी महात्मा गांधी हे भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता आहेत, अशा आशयाचं विधान केलं आहे.
अभिजित भट्टाचार्य हे यूट्यबवरील एका पॉडकस्टमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना अभिजित भट्टाचार्य यांनी महात्मा गांधी तसेच भारत आणि पाकिस्तान यावर भाष्य केलं.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

महात्मा गांधी यांच्यापेक्षाही पंचमदा (आर. डी. बर्मन) मोठे होते. पंचमदा हे संगितातील राष्ट्रपिता होते. महात्मा गांधी हे भारतासाठी नव्हे तर पाकिस्तानसाठी राष्ट्रपिता होते. भरत हा देश पहिल्यापासूनच होता. पाकिस्तानची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे चुकून महात्मा गांधी यांनी भारताचे राष्ट्रपिता असल्याचं सांगण्यात येतं, असं अभिजित भट्टाचार्य म्हणाले.

त्यांच्या या विधानानंतर संपूर्ण जग महात्मा गांधी यांच्यापुढे झुकतं ते का? असं विचारण्यात आलं. त्यावर बोलताना आगामी 10 वर्षांनंतर तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न विचारणारही नाहीत, असं उत्तर अभिजित भट्टाचार्य यांनी केलं. अभिजित भट्टाचार्य यांच्या या विधानाचा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अभिजित भट्टाचार्य काही दिवसांपूर्वी एका अनोख्या कारणामुळे चर्चेत आले होते. मुंबईत जगप्रसिद्ध गायक दुआ लिपा हिचा एक लाईव्ह कॉन्सर्ट झाला होता. या लाईव्ह् कॉन्सर्टदरम्यान अभिजित भट्टाचार्य यांच्या गाण्यावर दुआ लिपा चांगलीच थिरकली होती. त्यानंतर अभिजित भट्टाचार्य नव्याने चर्चेत आले होते.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button