Letest News
शिर्डी पोलिसांचा अ‍ॅक्टिव्ह मोड चैन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत दोघांना जेरबंद रात्रीच्या अंधारात मातीची ‘चोरी’! पोलिसांचा डंपरवर घाला पुणतांबा शिवारात ६ ब्रास गौण खनिजाची बेकायदा... गणपती मंडळासमोर राडा! दांडके फायटर अन् लोखंडी रॉडने मारहाणीचा आरोप साकुरी शिवमध्ये मोटारसायकलच्या धक... रंजल्या-गांजल्यांच्या आधारासाठी दानशूर पंकज लोढांचा पुढाकार स्नेहालयासाठी ११ गुंठे जमीन देणगी सन्मित्र युवक मंडळाचा ६२ वा गणेश याग आजपासून कर्तव्यावर सापडली सोन्याची अंगठी पुजाऱ्याने दाखविली प्रामाणिकता ३४ वर्षांची परंपरा कायम डीजेला फाटा देत क्रांती युवक मंडळाचा भक्तिमय गणेशोत्सव! साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल
राजकीयशिर्डी

शिर्डीत श्री रामनवमी उत्सवाची भक्तीमय सांगता-दहिहंडी फोडत उत्सवाचा समारोप

शिर्डी : श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या वतीने मोठ्या भक्तीभावात साजऱ्या करण्यात आलेल्या श्री रामनवमी उत्सवाची आज दिमाखदार आणि उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली. बुधवार दिनांक २५ मार्चपासून सुरू झालेल्या या उत्सवाचा समारोप ह.भ.प. विक्रम नांदेडकर (गोरटे) यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर पारंपरिक दहिहंडी फोडून करण्यात आला.
🙏 पाद्यपूजा, रुद्राभिषेकाने सांगता दिनाची मंगल सुरुवात
उत्सवाच्या सांगता दिनी सकाळी संस्थानचे प्रशासकीय अधिकारी संदिपकुमार भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. स्मिता भोसले यांच्या हस्ते श्रींची पाद्यपूजा करण्यात आली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


तसेच गुरूस्थान मंदिरात मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व सौ. वंदना गाडीलकर यांच्या हस्ते विधीवत रुद्राभिषेक पूजा पार पडली.
🎶 काल्याच्या कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध; दहिहंडीने परंपरेचा उत्साह
सकाळी १० ते १२ या वेळेत श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपात ह.भ.प. विक्रम महाराज नांदेडकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने उपस्थित भाविकांना भक्तीच्या रंगात रंगवले.


कीर्तनानंतर श्री साईबाबांचे समकालीन भक्त तात्या पाटील कोते यांच्या वंशज परिवारातील श्री अभिराज मिलिंद कोते यांच्या हस्ते पारंपरिक दहिहंडी फोडण्यात आली, यामुळे उत्सवात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.
🏵️ कीर्तनकारांचा सत्कार; आरतीने वातावरण झाले भक्तिमय
कार्यक्रमानंतर कीर्तनकार महाराजांचा मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
त्यानंतर सकाळी १२.१० वाजता श्रींची माध्यान्ह आरती संपन्न झाली.


🎭 सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल; भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
उत्सवाच्या सांगता दिनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दुपारी १ ते ३ या वेळेत कला सौरभ संस्था, मुंबई यांचा कार्यक्रम झाला. त्यानंतर ३ ते ५ या वेळेत पुष्पांजली संगीत नाट्य अॅकॅडमी, बेंगळुरू यांचा देखील उत्कृष्ट सादरीकरण झाला.
सायंकाळी ७ ते ९.३० या वेळेत विजय साखरकर, मुंबई यांचा “साईस्वर नृत्योत्सव” कार्यक्रम रंगला.
या सर्व कार्यक्रमांना भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


🕯️ धूपारती ते शेजारती; भक्तीचा दिवसभर अनुभव
सायंकाळी ६.३० वाजता श्रींची धूपारती तर रात्री १० वाजता शेजारती पार पडणार असून, दिवसभर मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले.
🤝 अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी आयोजन
हा भव्य उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजीराव कचरे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व उपकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी संदिपकुमार भोसले, अतुल वाघ, मुख्य लेखाधिकारी मंगला वराडे, वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश ओक, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे, संरक्षण अधिकारी रोहीदास माळी यांच्यासह सर्व विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


✨ भक्ती, परंपरा आणि उत्साहाचा संगम; शिर्डी पुन्हा न्हाली साईनामात
या संपूर्ण उत्सव काळात शिर्डीत भक्ती, परंपरा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. देश-विदेशातून आलेल्या भाविकांनी उत्सवात सहभागी होत साईचरणी नतमस्तक होत आनंद व्यक्त केला.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button