Letest News
निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद “कायदा राखणारेच झाले लाचखोर!” — पाथर्डीत पोलीसांचा काळा चेहरा उघड “१० हजारांत पोटातील भविष्य विक्रीला!” — राहाता तालुक्यात गर्भलिंग निदानाचा काळाबाजार उघड जबरदस्ती धर्मांतराचा आरोप —आरोपी ताब्यात-विविध कलमांन्वये गुन्हा दाखल- शिर्डीत खळबळ- मुंबईच्या झोपडपट्टी दादाची शिर्डीत पेट्रोल पंपावर दादागिरी -शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल “९ नाण्यांचा वाद” पुन्हा पेटला — शिर्डीत संतापाची लाट-“भीती संपली म्हणून धंदा?” — ग्रामस्थांचा थेट स...
Blog

साई पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी लाखो साई भक्तांनी घेतले साई दर्शन!

शिर्डी –
श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने आयोजित केलेल्‍या १०५ व्‍या पुण्‍यतिथी उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहिल. तर मंदिर व मंदिर परिसरात मुंबई येथील व्‍दारकामाई मंडळाच्‍या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई व “श्री राम मंदीर ” हा भव्‍य देखावा व हैद्राबाद येथील दानशुर साईभक्‍त‍ श्रीमती रेणुका चौधरी यांच्‍या देणगीतून करण्‍यात आलेली आकर्षक फुलांची सजावट साईभक्‍तांसाठी लक्षवेधी ठरली.

sai nirman
जाहिरात


आज उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी श्री साईसच्‍चरित्र या पवित्र ग्रंथाच्‍या अखंड पारायणाची समाप्‍ती झाली. पारायण समाप्‍तीनंतर श्री साईबाबांच्‍या प्रतिमेची व श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्‍यात आली. या मिरवणूकीत संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी पोथी, तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी विणा, संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर व उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी प्रतिमा घेवून सहभाग घेतला. यावेळी, सौ.मालती यार्लगड्डा, प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे संरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, पुजारी, कर्मचारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

DN SPORTS


तर सकाळी ०७.०० वाजता संस्‍थानचे तदर्थ समितीचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ.मालती यार्लगड्डा यांच्‍या हस्‍ते समाधी मंदिरात पाद्यपुजा करण्‍यात आली.
सकाळी ०९.०० वाजता शिर्डी शहरातून काढण्‍यात आलेल्‍या भिक्षा झोळी कार्यक्रमात संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा, तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी सिध्‍दराम सालीमठ, संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी शिवा शंकर, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे, संरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, पुजारी, कर्मचारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सकाळी १०.०० वाजता ह.भ.प.प्रभंजन भगत यांचे किर्तन झाले. तसेच सकाळी १०.३० वाजता संस्थानचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ.मालती यार्लगड्डा यांच्‍या हस्‍ते समाधी मंदिराचे समोरील स्‍टेजवर आराधना विधी करण्‍यात आला. संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी शिवा शंकर, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, पुजारी, शिर्डी ग्रामस्‍थ व साईभक्‍त उपस्थित होते.

kamlakar


दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्‍यान्‍ह आरती झाली. सायंकाळी ०५.०० वाजता खंडोबा मंदिर येथे सिमोल्‍लंघन करण्‍यात आले. सायंकाळी ०६.०० वाजता श्रींची धुपारती झाली. तर रात्रौ ०७.३० ते १०.०० यावेळेत श्री.शैलेंद्र भारती, मालाड (ई), मुंबई यांचा साई भजन संध्‍या हा कार्यक्रम श्री हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडपातील स्‍टेजवर होईल. रात्रौ ०९.१५ वाजता श्रींच्‍या रथाची शिर्डी शहरातून सवाद्य काढण्‍यात आलेल्‍या मिरवणूकीत संस्‍थानचे अधिकारी, कर्मचारी, शिर्डी ग्रामस्‍थ व साईभक्‍तांनी मोठ्या संख्‍येने आपला सहभाग नोंदविला. तर श्री साईप्रसादालयामध्‍ये साईभक्‍तांच्‍या देणगीतून भक्‍तांना मोफत प्रसाद भोजन देण्‍यात आले. तसेच बेंगलोर येथील साईभक्‍तांनी श्रीसाई प्रसादालय करीता रक्‍कम रु. ३० लाख ५० हजार मात्र किंमतीचे एक अत्‍याधुनिक स्‍वयंचलित आटा युनिट देणगी स्‍वरुपात दिले आहे. सदर आटा युनिट मध्‍ये गहु साफ सफाई, निवडणे, दळणे हि कामे स्‍वयंचलित होणार आहेत. या आटा यु‍निटव्‍दारे प्रति तास १००० किलो आटा उपलब्‍ध होणार असुन सदर युनिट हे FSSAI चे नियमावली नुसार तयार करण्‍यात आलेले आहे.


उद्या बुधवार दिनांक २५ ऑक्‍टोबर रोजी उत्‍सवाच्‍या तृतिय दिवशी पहाटे ०५.०५ वाजता श्रींचे मंगलस्‍नान, सकाळी ०७.०० वाजता श्रींची पाद्यपुजा होईल. दुपारी १२.१० वाजता श्रींची माध्‍यान्‍ह आरती, दुपारी ०४.०० ते ०६.०० यावेळेत ह.भ.प. प्रभंजन भगत यांचे कीर्तन कार्यक्रम श्रींचे समाधी मंदिराच्‍या उत्‍तर बाजुचे स्‍टेजवर होणार आहे. सायंकाळी ०६.०० वाजता श्रींची धुपारती होईल. रात्रौ ०७.३० ते ०९.४५ यावेळेत शाहिर श्री उत्‍तम रामचंद्र गायकर, वाघेरे, जि. नाशिक यांचा साई भजन संध्‍या कार्यक्रम हा कार्यक्रम श्री हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडपातील स्‍टेजवर होईल. रात्रौ १०.०० वाजता श्रींची शेजारती होणार आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button