Letest News
‘टक्केवारी कुणी मागितली?’ ते ‘ट्रम्पमुळे डांबर मिळत नाही!’ नगर–मनमाड रस्त्यावर राजकारण तापले श्रीरामपुरात जेधे–बेग टोळीवर कायद्याचा दणका!खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात बीएनएस कलम १११चा वापर बंटी लहामगे फरार- पण गुटखा तस्करी जोमात ‘त्या’ नेटवर्कला कोणाचा वरदहस्त? गुन्हा दाखल असताना आरोपी रा... श्री साई पारायण तीर्थयात्रा-२०२६; काशी-अयोध्येसह पशुपतीनाथ दर्शनाची सुवर्णसंधी! विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतले साई समाधीचे मनोभावे दर्शन शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रेशनचा तांदूळ बोबडे आणि पवार काळ्या बाजारात नेतो! गोर - गरीबांच्या मुखातील  अन्न कसा हिरावून घेतो !! सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साई मंदिरात सापडली ४८ हजारांची सोन्याची अंगठी-कर्तव्य बजावताना सापडली सोन्याची अंगठी लक्ष्मण घोरपडें... राहाता तालुक्यातील एकरूखे येथे सरकारी वकिलाच्या घरी धाडसी दरोडा- १.५१ लाखांचा ऐवज लुटून चार दरोडेखोर... साईबाबांवर हात ठेवून शपथ घ्या- टक्केवारी कोणी मागितली?निलेश लंके यांचा विखेंवर घणाघात
राजकीयशिर्डी

शिर्डीत ‘नो व्हेईकल झोन’मुळे भक्त सुरक्षित मात्र व्यापाऱ्यांच्या अडचणी वाढल्या १८ मीटर रोडचा पर्याय-वाहतूक कोंडी सुटेल-व्यवसायालाही चालना – व्यापारी

शिर्डी (साई दर्शन न्यूज) – नाताळ व २०२६ नववर्षाच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र शिर्डीत साईभक्तांची विक्रमी गर्दी पाहायला मिळत आहे. या वाढत्या गर्दीमध्ये भाविकांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देत पोलीस प्रशासनाने श्री साईबाबा मंदिर परिसर तसेच नगर–मनमाड महामार्गालगतचा भाग ‘नो व्हेईकल झोन’ म्हणून घोषित केला आहे. या निर्णयामुळे मंदिर परिसर पूर्णतः वाहनमुक्त करण्यात आला आहे.
या निर्णयाचे साईभक्तांकडून मोठ्या प्रमाणावर स्वागत होत असून, वाहनांची वर्दळ बंद झाल्याने चेंगराचेंगरीचा धोका कमी झाला आहे. दर्शन रांगा सुरळीत सुरू असून, वृद्ध, महिला, दिव्यांग तसेच बालभाविकांना सुरक्षितपणे दर्शन घेता येत असल्याची प्रतिक्रिया भाविकांकडून व्यक्त केली जात आहे. अनेक भाविकांनी सांगितले की, वाहनमुक्त परिसरामुळे दर्शनाचा अनुभव अधिक शांत, शिस्तबद्ध व सुरक्षित झाला आहे.
मात्र, दुसऱ्या बाजूला स्थानिक व्यावसायिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘नो व्हेईकल झोन’मुळे वाहतूक एका ठराविक मार्गावर केंद्रीत झाल्याने काही बाजारपेठा व दुकाने तुलनेने ओस पडल्याचे चित्र दिसून येत आहे. गर्दी एका बाजूनेच ये-जा करत असल्याने इतर भागातील दुकानदारांना अपेक्षित व्यवसाय मिळत नसल्याची तक्रार करण्यात येत आहे.
व्यावसायिकांचे म्हणणे आहे की, जर १८ मीटर रोडवरून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली, तर संपूर्ण शिर्डी शहरात वाहतुकीचा ताण समान प्रमाणात विभागला जाईल. यामुळे वाहतूक कोंडी टळेल, भाविकांनाही चालणे सोपे जाईल आणि सर्व भागातील व्यावसायिकांना समान संधी मिळेल, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. या मागणीसाठी काही व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे लेखी निवेदन देण्याची तयारी सुरू केली आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाविकांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता असून परिस्थितीचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. गर्दीचा ओघ, वाहतूक कोंडी आणि व्यावसायिकांच्या तक्रारी यांचा समतोल साधून योग्य तोडगा काढण्याबाबत विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
साईभक्तांची श्रद्धा, सुरक्षितता आणि स्थानिक अर्थव्यवस्था यांचा सुवर्णमध्य साधत प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे आता भाविकांसह व्यापारी व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button