Letest News
समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे वाड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन साईसच्चरिताचा जयघोष सवाद्य मिरवणुकीने पारायण सोहळ्याला दिमाखात सुरुवात! मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांचा शिर्डीत धुमाकूळ लाखोच्या सोन्याची चैन हिसकावली गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका
राजकीयशिर्डी

नववर्षाच्या स्वागतासाठी साईनगरीत भक्तीचा महाकुंभ- लाखो भाविकांची अलोट गर्दी

शिर्डी (साई दर्शन न्यूज) – निरोप देत असलेल्या वर्षाला निरोप देत आणि २०२६ नववर्षाच्या स्वागतासाठी देश-विदेशातील लाखो साईभक्तांनी श्री क्षेत्र शिर्डीत अलोट गर्दी केली.
‘अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज साईनाथ महाराज की जय’ या जयघोषाने अवघी साईनगरी दणाणून गेली होती. दोन दिवसांत सुमारे तीन लाखांहून अधिक भाविकांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेत नववर्षाचा संकल्प केला.
नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत दिवाळीसारखा उत्साह पाहायला मिळाला. बेंगळूरू येथील दानशूर साईभक्त श्री. बी. ए. बसवराज यांच्या देणगीतून समाधी मंदिर परिसरात मनमोहक व सुगंधी फुलांची सजावट करण्यात आली होती. तसेच साईसमर्थ निलेश नरोडे व स्थानिक व्यावसायिकांच्या सहकार्याने करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण साईनगरी झगमगाटात न्हाऊन निघाली. हॉटेल्स, लॉजेस, रस्ते व चौक दिव्यांच्या माळांनी उजळून निघाले होते.
मध्यरात्री बाराच्या ठोक्याला नववर्षाचे आगमन होताच शिर्डीत उत्साहाचे उधाण आले. या मंगलप्रसंगी केंद्रीय कृषी मंत्री मा. ना. श्री. शिवराजसिंग चौहान तसेच पालकमंत्री मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांनी साई दरबारी हजेरी लावून दर्शन घेतले. नववर्षाचा श्रीगणेशा साई चरणी करण्यासाठी भाविकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.
भाविकांच्या सोयीसाठी रात्री उशिरापर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले, त्यामुळे रात्रभर दर्शनाच्या रांगा सुरू होत्या. वाढती गर्दी लक्षात घेता साई संस्थानने अभूतपूर्व नियोजन करत उशिरापर्यंत भोजन व्यवस्था, रात्रभर अतिरिक्त लाडू प्रसाद काउंटर सुरू ठेवले. सुमारे ४०० क्विंटल लाडू व बुंदी प्रसादाचे पाकिटे भाविकांना वितरित करण्यात आली.
गर्दीच्या व्यवस्थापनासाठी ४६ हजार चौरस फुटांचे भव्य मंडप उभारण्यात आले होते. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त, रुग्णवाहिका व आपत्कालीन सेवा सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांनीही नववर्षाच्या पूर्वसंध्येला साईदरबारी हजेरी लावली.
शहरात ठिकठिकाणी झालेली फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि साईनामाचा जयघोष यामुळे नववर्षाचे स्वागत अत्यंत आनंदमय वातावरणात झाले. प्रचंड गर्दीमुळे शिर्डीतील सर्व रस्ते, वाहनतळे व निवास व्यवस्था पूर्णतः भरून गेल्या होत्या. मात्र या भक्तीच्या महाकुंभात प्रत्येक भक्त साईमय झालेला पाहायला मिळाला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button