Letest News
श्रीरामपूरात खळबळ! अल्पवयीन मुलीचे अपहरण-अत्याचार आरोपी सोनू बेगच्या अडचणीत मोठी भर २० हजारांचा सौदा'! संगमनेरच्या तांबे हॉस्पिटलवर ACB चा गुन्हा मॅनेजरसह दोघे जाळ्यात ऊर्जा बचतीचा संदेश देत श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी अल्पवयीनेचे अपहरण करून बलात्कार आरोपीला नैसर्गिक मृत्यूपर्यंत सश्रम कारावास! शिर्डी दर्शनावरून परतणाऱ्यांवर थरारक दरोडा अपहरण करणाऱ्या टोळीतील ५ जण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्य... शिर्डी हादरवणाऱ्या हत्येतील आरोपी महिलांना कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी साईनगरीत रक्तरंजित थरार! मंदिराच्या गेट क्रमांक ४ समोर महिलेचा निर्घृण खून- जागेच्या वादातून दोन तरु... बँकेच्या 2.11 कोटींच्या थकबाकीवरून शिर्डीत हॉटेलवर कारवाई-ताबा घेण्यास विरोध-चार महिलांविरुद्ध शिर्ड... साईबाबांच्या चरणी विधानपरिषद अध्यक्ष राम शिंदे समाधी दर्शनानंतर संस्थानकडून सत्कार "निष्ठावान कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये-भाजप सदैव त्यांच्या पाठीशी उभा आहे" – विधानपरिषदेचे सभापती प...
क्राईमशिर्डी

शिर्डीत भरदिवसा चैन स्नॅचिंगचा थरार-महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून दुचाकीवरून चोरटे पसार

शिर्डी | प्रतिनिधी
साईबाबांच्या शिर्डीत पुन्हा एकदा भरदिवसा चैन स्नॅचिंगची धक्कादायक घटना घडली असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साईनगर परिसरात घरासमोर उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातील सुमारे १ लाख २ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन दोन अज्ञात चोरट्यांनी क्षणार्धात हिसकावून नेल्याची घटना सोमवारी (दि.१५) दुपारी घडली.
याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यशोदा भगवान ठाकरे (वय ५२, रा. साईनगर, शिर्डी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशोदा ठाकरे या आपल्या घरासमोर उभ्या असताना एक अनोळखी इसम पायी चालत त्यांच्या जवळ आला. त्याने अचानक त्यांच्या गळ्यातील सुमारे ३ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जोराने ओढून तोडली. या प्रकारात महिलेस किरकोळ दुखापतही झाली. त्यानंतर आरोपी घराच्या उत्तरेकडील रस्त्यावर मोटारसायकलसह तयार उभ्या असलेल्या आपल्या साथीदाराकडे धावत गेला आणि दोघेही क्षणार्धात घटनास्थळावरून पसार झाले.


भरदिवसा गर्दीच्या वस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे शिर्डीतील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. शहरात वाढत्या चोऱ्या, स्नॅचिंग आणि गुन्हेगारी घटनांमुळे पोलिसांच्या गस्त व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button