Letest News
नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी! तीन किलोमीटर दूर श्रीराम मंदिर कशासाठी? साईभक्त डॉ. एस. बी. गोंदकर पाटील यांचा प्रांजळ आग्रह समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप
राजकीयशिर्डी

युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर परदेशात अडकलेल्या नागरिकांसाठी प्रशासन सतर्क-जिल्हा हेल्पलाईन जारी

परदेशात अडकलेल्या नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाईन जारी
अहिल्यानगर, दि. २ : मध्यपूर्व व आखाती परिसरात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारचे परराष्ट्र मंत्रालय तसेच महाराष्ट्र शासनाने परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिक परदेशात अडकले असल्यास त्यांच्या नातेवाईकांनी त्वरित जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे.


🚨 राज्य व जिल्हा स्तरावर २४x७ मदत व्यवस्था
परदेशातील भारतीयांच्या सुरक्षिततेवर महाराष्ट्र शासन व परराष्ट्र मंत्रालय यांचे बारकाईने लक्ष असून, आवश्यकतेनुसार त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
राज्य आपत्कालीन कार्यकेंद्र (२४x७) संपर्क क्रमांक :


📞 टोल फ्री : १०७०
📞 फोन : ०२२-२२०२७९९०, +९१-९३२१५८७१४३
📧 ई-मेल : controlroom@gov.in
📞 अहिल्यानगर जिल्हा नियंत्रण कक्ष
परदेशात अडकलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांबाबत माहिती देण्यासाठी किंवा मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.


📞 जिल्हा नियंत्रण कक्ष : ०२४१-२३२३८४४ / ०२४१-२३५६९४०
📞 टोल फ्री : १०७७
⚠️ परदेशात अडकलेल्या नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना
१. सुरक्षित ठिकाणी राहावे व अनावश्यक हालचाल टाळावी.
२. संबंधित देशातील भारतीय दूतावास/कॉन्स्युलेटच्या अधिकृत सूचनांचे काटेकोर पालन करावे.
३. आपले सध्याचे लोकेशन व परिस्थितीची माहिती कुटुंबीयांना नियमित कळवावी.
४. मोबाईल पूर्ण चार्ज ठेवावा; पासपोर्ट, व्हिसा व आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवावीत.
५. सोशल मीडियावर अफवा किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित करू नये.
६. संबंधित भारतीय दूतावासात आपली नोंदणी करणे अत्यावश्यक आहे.


🌐 विविध देशांतील भारतीय दूतावास सज्ज
तात्काळ मदतीसाठी इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), पॅलेस्टाईन (रामल्लाह), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी), कुवैत, बहरीन, मस्कत, जॉर्डन आणि इराक (बगदाद) येथील भारतीय दूतावासांनी २४x७ आपत्कालीन हेल्पलाईन, व्हॉट्सॲप क्रमांक व ई-मेल सुविधा सुरू केल्या आहेत. गरज भासल्यास नागरिकांनी संबंधित दूतावासाशी तातडीने संपर्क साधावा.
🔹 जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी संयम राखून अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन केले आहे.
— साईदर्शन न्यूज

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button