Letest News
शिर्डीतील ‘चिन्नाराव’ हॉटेलच्या जेवणात झुरळ? फोटो समोर येताच खळबळ! “विखे पाटलांना काहीच कळत नाही त्यांना फक्त साखर कारखानाच कळतो!” – मनोज जरांगे पाटील तालुक्याला दोन आमदार पण एकही नाही दमदार!रस्त्यांच्या खड्ड्यांनी हैराण कोपरगावकरांचा संताप फलकावर पुण्यातील साईभक्त रामदास तापकीर यांनी अर्पण केला १३ लाख ४२ हजार ९८० रुपये किंमतीचा ९० ग्रॅम सोन्याचा... शिर्डीचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अमोल विठ्ठलराव गंगलवाड चे टोकाचे पाऊल रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्... उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन अहिल्यानगर पोलिस दलात खळबळ! अमली पदार्थ विक्रीकांडात LCBचे माजी प्रमुख कबाडींना मॅटचा दणका नितीन गडकरी ॲक्शन मोडमध्ये- नगर–मनमाड महामार्गाच्या चौकशीसाठी केंद्रीय समिती‘ट्रंप तात्या डांबर देत ... राहता पोलिसांची दमदार कारवाई काल महिलेला लुटले आज चारही आरोपी ताब्यात! श्री साईबाबांच्या चरणी ११ लाख १९ हजार रुपयांचे हिरेजडित सोन्याचे ब्रोच अर्पण
अ.नगरक्राईम

पोलिसांची ऐतिहासिक कारवाई!-कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे-अग्नीशस्त्रांच्या गुंडांची टोळी पोलिसांनी हद्दपार केली!

कोपरगाव शहरात गेल्या काही वर्षांपासून अग्नीशस्त्रांसह दहशत माजवून सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील करणाऱ्या सराईत गुन्हेगारी टोळीवर अखेर पोलिसांनी मोठी आणि निर्णायक कारवाई करत टोळीची पांगापांग केली आहे. जिवे ठार मारण्याचे प्रयत्न, दंगल, मारहाण, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान अशा गंभीर गुन्ह्यांमुळे चर्चेत असलेली ही टोळी अखेर हद्दपार करण्यात आली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


🧾 टोळीचा कुख्यात चेहरा
या गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या
सागर उर्फ मोद्दा रामदास मंजुळ (वय २६, रा. महादेवनगर, कोपरगाव) याच्यासह त्याचे साथीदार
1️⃣ अतुल देविदास आव्हाड (२०, गजानननगर)
2️⃣ भारत भाऊसाहेब आव्हाड (२२, लिंबारा मैदान)
3️⃣ नयन गोविंद शिंदे (२२, गांधीनगर)
4️⃣ आकाश सखाराम माकोणे (२४, लिंबारा मैदान)
5️⃣ विकी किशोर शिंदे (२०, गांधीनगर)
यांनी संघटित टोळी तयार करून कोपरगाव शहरात आपले गुन्हेगारी साम्राज्य उभे करण्याचा प्रयत्न केला होता.


💥 गुन्ह्यांची थरारक मालिका
टोळीने आपली दहशत कायम ठेवण्यासाठी
नागरिकांना बेदम मारहाण
अल्पवयीन मुलीशी लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य
शिवीगाळ, धमकी, दमदाटी
जमाव गोळा करून दंगल
अग्नीशस्त्र व घातक शस्त्रांचा खुलेआम वापर
जिवे ठार मारण्याचे प्रयत्न
सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड
असे गुन्हे सराईतपणे आणि वारंवार केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.


😱 नागरिक भयभीत – तक्रार करायलाही धजावत नव्हते
सन २०१४ ते २०२० या कालावधीत टोळीच्या वाढत्या गुंडगिरीमुळे कोपरगाव शहरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
टोळीच्या दहशतीमुळे
👉 कोणीही नागरिक उघडपणे तक्रार देण्यास
👉 साक्ष देण्यास
👉 पोलिसांशी सहकार्य करण्यास
तयार नव्हते, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती.


⚖️ कायद्याचा वचक – कलम ५५ अंतर्गत कारवाई
कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. रामकृष्ण कुंभार यांनी टोळीच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांचा सखोल अहवाल तयार करून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ अंतर्गत हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला.
या प्रस्तावाची सखोल चौकशी
श्री. अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग
यांनी करून तपशीलवार चौकशी अहवालासह शिफारस केली.


🛑 अखेर हद्दपारीचे आदेश
सर्व बाजूंनी तपास करून
सागर उर्फ मोद्दा रामदास मंजुळ
अतुल देविदास आव्हाड
भारत भाऊसाहेब आव्हाड
यांना अहिल्यानगर जिल्ह्याच्या हद्दीतून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत.


🚓 जिल्हाभर गुन्हेगार टोळ्यांवर पोलिसांचा वॉच
अहिल्यानगर जिल्ह्यात संघटितपणे
शरीराविरुद्ध
मालाविरुद्ध
गोवंशीय कायदे
भारतीय हत्यार कायदे
वाळू चोरी
अशा गंभीर गुन्ह्यांत सहभागी असलेल्या सराईत टोळ्यांची माहिती संकलित करून त्यांच्यावर हद्दपारी, प्रतिबंधात्मक व कठोर कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


🚨 इशारा स्पष्ट आहे…
❌ गुंडगिरी चालणार नाही
❌ दहशतीला थारा नाही
❌ कायदा हातात घेणाऱ्यांना जिल्ह्यात जागा नाही
👉 कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे!
👉 अहिल्यानगर पोलीस – गुन्हेगारांसाठी काल! 🔥🚔

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button