Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
क्राईमशिर्डी

सावळी विहीरमध्ये घरफोडीचा थरार- कडी-कोयंडा तोडून चोरट्यांचा धुमाकूळ !

शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्यांच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसताना सावळी विहीर परिसरात पुन्हा एकदा अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करत नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. भर पहाटे घराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश करत चोरट्यांनी रोख रक्कम आणि घरातील वस्तूंवर हात साफ केला. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तमराव प्रमोद सावळे (धंदा मजूर, रा. सावळी विहीर, ता. राहाता) हे आपल्या कुटुंबासह राहत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरावर डल्ला मारला. १८ मे २०२६ रोजी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाट उचकटून सुमारे ३० हजार रुपयांची रोख रक्कम तसेच जुन्या वापरातीलविशेष म्हणजे चोरट्यांनी घरात प्रवेश करताना कोणताही आवाज होऊ न देता चोरी केल्याने परिसरात कार्यरत असलेल्या चोरट्यांची टोळी सक्रिय असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या घरफोड्यांमुळे नागरिकांनी रात्री गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५(३) अंतर्गत गुन्हा रजिस्टर क्रमांक ४२०/२०२६ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी भारती सोळंके यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका दातीर पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, शिर्डी आणि राहाता तालुक्यात सातत्याने होत असलेल्या चोरी आणि घरफोडीच्या घटनांमुळे पोलीस गस्त आणि गुप्त माहिती यंत्रणेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. “चोरटे इतके बिनधास्त कसे?”, “रात्रीची गस्त नेमकी कुठे असते?” असे सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होत आहेत.
स्थानिक नागरिकांनी सीसीटीव्ही तपासणी, रात्रीची गस्त वाढविणे आणि संशयितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. साड्या चोरून नेण्यात आल्या.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button