Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
अ.नगर

न्यायाधीश यार्लगड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर, अहमदनगर बार असोसिएशन, अहमदनगर आणि सेंट्रल बार असोसिएशन, अहमदनगर यांचे संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 27/07/24 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन अहमदनगर जिल्हा न्यायालय, सर्व तालुका न्यायालयांमध्ये करण्यात आले होते. राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन समारंभ जिल्हा न्यायालय] अहमदनगर येथे संपन्न झाला. राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन रोपट्याला पाणी घालून पक्षकार व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. सुधाकर यार्लगड्डा हे होते. सदर कार्यक्रमास मा. श्री. राजेंद्र पाटील] निवासी उपजिल्हाधिकारी] अहमदनगर] जिल्हा सरकारी वकील ॲड. श्री.सतीश पाटील] अहमदनगर बार असोसिएशन अध्यक्ष] ॲड. श्री. नरेश गुगळे अति.पोलीस अधीक्षक] श्री.प्रशांत खैरे] पोलीस उप अधिक्षक, श्री.हरीष खेडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मा. अध्यक्ष] जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश] अहमदनगर सुधाकर यार्लगड्डा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात जीवन एक तडजोड आहे, प्रत्येकाने आयुष्यात तडजोड केली पाहिजे. तसेच जास्तीत जास्त प्रकरणे आप आपसात तडजोड करून मिटविले पाहिजे असे सांगितले. लोक अदालत मध्ये ग्रामपंचायत] जिल्हा परिषद, महसूल आणि वीज वितरण, बँका] पतसंस्था, इन्शुरन्स कंपनी सहभागी होत असतात म्हणून हा एक महायज्ञ असून त्यामध्ये प्रत्येकाने आप आपले योगदान दिले पाहिजे असे प्रतिपादन केले.

sai nirman
जाहिरात

सदर कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव] भाग्यश्री काशिराम पाटील यांनी केली. या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना ॲड. नरेश गुगळे यांनी जे प्रकरणे समोपचाराने मिटवण्यासारखे आहेत, ती प्रकरणे लोक अदालत मध्ये मिटवावीत. सामान्य लोकांनी वेळ व दिवस वाया न घालवता सदरील प्रकरणे जास्तीत जास्त मिटवून त्याचा फायदा घ्यावा, असे प्रतिपादन केले.

राष्ट्रीय लोक आदलतीच्या उद्घाटनाच्या वेळी ॲड. श्री. भूषण बऱ्हाटे] ॲड. श्री.विक्रम वाडेकर] ॲड. सागर पदिर] ॲड. श्जाभाऊ शिर्के] ॲड. पिंटू पाटोळे] ॲड.अंधारे] श्रीमती भाग्यश्री पाटील] सचिव] जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व इतर माननीय न्यायिक अधिकारी उपस्थित होते.

DN SPORTS

ॲड. वृषाली तांदळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व ॲड. सुनील मुंदडा] यांनी आभार प्रदर्शन केले. सदर लोक अदालत यशस्वी करणे कामी दोन्ही बारचे सदस्य व जिल्हा न्यायालयाचे कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button