Letest News
मध्यरात्री दरोड्याने थरकाप-अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाची दमदार कामगिरी – आंतरजिल... शिर्डीत ‘जमीन सौदा’ बॉम्ब फुटणार? भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरातच्या ५० कोटींच्या व्यवहारावर पोलिसांची ... पोटनिवडणुकीत माध्यमांवर कडक नियम-जाहिरातींसाठी पूर्व मंजुरी अनिवार्य नाशिक प्रकरणात खळबळ! भोंदू बाबा अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वाढ – ‘५ नरबळी’चा धक्कादायक संशय शिर्डीतील ‘क्लासिक आइसक्रीम’ची जागतिक भरारीकडे वाटचाल-नूतन आइसक्रीम युनिटचे भव्य उद्घाटन   ब्रेकिंग : ‘पेनड्राईव्ह’साठी रचला गेला मोठा कट-अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ  वाघचौरे यांना फसवण्याचा... सुपर ब्रेकिंग : ‘पेनड्राईव्ह’साठी रचला गेला मोठा कट asp वाघचौरे यांना फसवण्याचा प्रयत्न फसला! ६,५०० रुपयांच्या लाचेप्रकरणी जिल्हा परिषद अभियंता जाळ्यात! ACB ची धडक कारवाई शिर्डीत ११५ वा श्रीरामनवमी उत्सव-लाखो साईभक्तांच्या स्वागतासाठी भव्य तयारी पूर्ण! खरातचा काळा खेळ उघड! शिर्डी पोलिसांची गुप्त मोहीम ठरली निर्णायक
राजकीयशिर्डी

शिर्डीतील लक्ष्मीनगर अतिक्रमण हटविण्यास सुरुवात नागरिकांकडून स्वयंस्फूर्तीने सहकार्य

शिर्डी | प्रतिनिधी
Shirdi Sai Baba Temple परिसरातील लक्ष्मीनगर भागात अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून येथील नागरिक स्वतःहून आपली घरे, दुकाने आणि शेड काढून घेऊ लागले आहेत. Shirdi Nagar Parishad प्रशासनाने १० मार्चपर्यंतचा अंतिम अल्टिमेटम दिल्यानंतर संभाव्य नुकसान टाळण्यासाठी रहिवासी प्रशासनाला सहकार्य करत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


लक्ष्मीनगर परिसरातील अतिक्रमणाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत होता. मात्र, नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर प्रशासनाने या प्रश्नावर ठोस भूमिका घेत कारवाईची तयारी सुरू केली. प्रशासनाची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर संभाव्य कारवाईपूर्वीच अनेक रहिवाशांनी आपली बांधकामे हटवण्यास प्राधान्य दिले आहे.

अतिक्रमण काढताना नागरिक स्वतःच पत्रे, दरवाजे, खिडक्या तसेच इतर बांधकाम साहित्य ट्रॅक्टरमधून हलवताना दिसत आहेत. या प्रक्रियेसाठी नगरपरिषदेच्या वतीने साहित्य वाहून नेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वाहनेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. भर उन्हातही नागरिक आपले साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवताना दिसत आहेत.
राहाता तालुक्यातील शिर्डी, सावळीविहीर खुर्द, सावळीविहीर बुद्रुक आणि निमगाव कोहाळे या गावांमधील बहुतांश अतिक्रमणे यापूर्वीच हटविण्यात आली आहेत.


काही ठिकाणी विस्थापित अतिक्रमणधारकांना अर्धा गुंठा जागा देण्यात आली असून उर्वरित प्रकरणांमध्ये प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. भविष्यात शासनाच्या योजनांद्वारे हक्काची जागा आणि निवारा मिळेल, या विश्वासामुळे नागरिक प्रशासनाला सहकार्य करत स्वतःहून अतिक्रमण हटवताना दिसत आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button