Letest News
संघटित गुन्हेगारीचे कलम १११ लागू आरोपींवर 'मोक्का'सारखी कठोर कारवाई AI चा गैरवापर की राजकीय कट? पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नावाने मॉर्फ ऑडिओ-व्हिडिओ प्रकरण-संगम... शरीरात घुसला चक्क बॉलपेन- श्री साईनाथ रुग्णालयात दुर्मिळ व जीवघेण्या शस्त्रक्रियेला यश शिर्डीतील महिला हत्येनंतर माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांची काव्यात्मक टीका-सोशल मीडियावर चर्चेला उध... शिर्डीच्या भूमिपुत्री डॉ. सिमरन साई कोतकर यांची वारकऱ्यांसाठी निस्वार्थ सेवा-सर्वत्र कौतुकाचा वर्षाव शिर्डी पोलिसांचा गुटखा माफियांवर धडक प्रहार! दोन ठिकाणी एकाच वेळी छापे दोघे ताब्यात हजारो रुपयांचा ग... साई समाधीवरील चित्रीकरण प्रकरण पेटले- सखोल चौकशीसह फोटो एडिट करून विकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची ... महिलेचा खळबळजनक आरोप-बलात्कार-पिस्तुलाचा धाक जीवे मारण्याच्या धमक्या शिर्डी पोलिसांत मध्यरात्री FIR जर्मनीतील ४१ साईभक्तांची शिर्डीत भक्तीमय साईसेवा समाधी मंदिरात गुंजले साईभजन ठगसेन भूपेंद्र सावळेचे साथीदार फरार आरोपींना कोणाचे अभय?" – DGP समोर डॉ. राजेंद्र पिपाडांचा संतप्त स...
क्राईमशिर्डी

शिर्डी ते पनवेल … फसवणुकीचा खेळ उघड! 50 हजारांच्या झोपडपट्टीत घुसून शिर्डी पोलिसाने केला आरोपीचा ‘गेम ओव्हर’!”

शिर्डी (प्रतिनिधी) :
ऑनलाईन खरेदीच्या वाढत्या ट्रेंडसोबत फसवणुकीचे प्रकारही मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. अशाच एका धक्कादायक प्रकरणात शिर्डीतील संपादक जीतेश लोकचंदानी यांना फेसबुकवर कार विक्रीच्या आमिषाने 11 हजार रुपयांना गंडा घालण्यात आला. मात्र, या प्रकरणाचा शेवट शिर्डी पोलिसांच्या धाडसी कारवाईने झाला असून आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आली आहे.
फिर्यादींने 25 डिसेंबर 2025 रोजी फेसबुकवर डस्टर कंपनीची चारचाकी गाडी विक्रीसाठी असल्याची जाहिरात दिसली.
गाडी चांगली मिळत असल्याचे पाहून त्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. संबंधित इसमाने स्वतःचे नाव सरवर हुसेन जाकीरहुसेन सय्यद (रा. पनवेल, जि. रायगड) असे सांगत गाडीची किंमत 2,20,000 रुपये सांगितली. बोलणी करताना व्यवहार 1,80,000 रुपयांवर ठरला.
विश्वास बसावा म्हणून आरोपीने गाडी दाखवण्याचे आश्वासन दिले. फिर्यादींचा मुलगा गौरव मुंबईत जाऊन गाडी पाहूनही आला. त्यानंतर 5 जानेवारी 2026 रोजी आरोपीने ‘विसार’ म्हणून 11,000 रुपये फोनपेवर घेतले.
मात्र, यानंतर सुरू झाला फसवणुकीचा खेळ…
आरोपीने “पुतण्याचा मृत्यू झाला”, “गाडी नाशिकला पाठवतो”, अशा विविध कारणांनी फिर्यादींना वारंवार फिरवले. फिर्यादींचा मुलगा व ड्रायव्हर मुंबई, नाशिक येथे जाऊनही गाडी मिळाली नाही.
शेवटी आरोपीचा मोबाईल बंद लागल्याने फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.
🚨 गुन्हा दाखल
या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 0063/2026, भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 318(4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
👮‍♂️ पोलिसांची ‘रिअल हिरो’ कारवाई
पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यानी तपासाची जबाबदारी पोलीस हवालदार दिनकर चव्हाण यांच्यावर सोपवली आरोपी मुंबईतील वडाळा येथील प्रबुद्ध नगर झोपडपट्टीत लपून बसल्याची माहिती मिळाली.
हा परिसर सुमारे 50 हजार लोकवस्तीचा आणि अतिसंवेदनशील मानला जातो. याच भागात यापूर्वी 2 पोलिसांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत.
तरीही चव्हाण यांनी भीती न बाळगता आपले जुने खबरे सक्रिय केले. अनेक वेळा मुंबईत जाऊन गुप्त तपास केला. योग्य वेळ साधत अखेर सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आली.
🎯 वरिष्ठांचे मार्गदर्शन
ही संपूर्ण कारवाई शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
⚠️ नागरिकांसाठी इशारा
👉 फेसबुक, OLX, इंस्टाग्रामवर स्वस्तात वस्तू मिळत असल्याच्या जाहिरातींना लगेच बळी पडू नका
👉 व्यवहार करण्यापूर्वी विक्रेत्याची ओळख व कागदपत्रे तपासा
👉 अ‍ॅडव्हान्स पैसे देताना विशेष काळजी घ्या

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button