Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
अ.नगरक्राईम

शिक्षकाने छातीत धक्का दिला, पढेगाव येथील मुलीचा मृत्यू खुनाचा गुन्हा दाखल

मृत्यू झालेल्या मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे, की कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथील चारी नंबर ४५ जवळ असलेल्या शाळेमध्ये आमची मुलगी शिकते. विद्यार्थिनी कुमारी तृप्ती दीपक भोसले वय ९ वर्षे राहणार पढेगाव ही दिनांक १ एप्रिल २०१८ रोजी शाळेमध्ये उशिरा गेल्याने शिक्षक सुनील दिगंबर हांडे यांनी तृप्ती हिला वर्गाबाहेर उभे केलं आणि तिच्या छातीत धक्का दिला. ती पायऱ्यांवरून खाली घसरून पडली. यात ती गंभीररित्या जखमी झाली आहे. तसंच तिला पुढील उपचासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान विद्यार्थिनी तृप्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर तिच्या पालकांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. शिक्षक सुनील दिगंबर हांडे, वय ४५ राहणार निवारा कोपरगाव शहर यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर २४६/२०२४ भादवी कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसंच शिक्षकांनी केलेल्या मारहाणीमुळेच मुलीचा मृत्यू झाल्या असल्याचा तक्रारी अर्ज मुलीच्या आईने न्यायालयात दाखल केला होता. त्यावरून माननीय न्यायालयाने सदर अर्जावर शिक्षकाविरुद्ध ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करुन सी. आर. पी. सी. १५६ प्रमाणे तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश केले आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे या करत आहे. एकंदरीतच झालेल्या या घटनेमुळे शिक्षक वर्गासह पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button