Letest News
समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप शिर्डी पोलिसांची दमदार कामगिरी!मंदिर परिसरातून बेपत्ता झालेली १२ वर्षीय चिमुरडी काही तासांत सुखरूप आ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे भाजप पदाधिकाऱ्यांची पाठ; विखे यांना कर्जतमध्येच धक्का? शिर्डीतील 'झिंग्या'वर एमपीडीएचा बुलडोझर- खून-अपहरण-मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची थेट नाशिक कारा... लेंडीबागेत नव्हे तर आरक्षित जागेवर उभारा भव्य श्रीराम-श्रीकृष्ण मंदिर! शिर्डी ग्रामस्थांचे साई संस्थ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी शिर्डी गुटखा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? थेट लोकायुक्त- एसीबी आणि आयुक्तांकडे धडक-एफडीए अधिकाऱ्यांच्या... शिर्डीचा विकास थांबवणारे नेमके कोण? — ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बनकर यांचा परखड सवाल
शिर्डी

गोकुळाष्‍टमी उत्‍सवानिमित्‍त श्री साईबाबा समाधी मंदिरात श्रीकृष्‍ण जन्‍मोत्‍सव साजरा

Shri Krishna Janmotsav celebrated at Shri Saibaba Samadhi Temple on the occasion of Gokulashtami Utswani

शिर्डीः-
श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने आयोजित केलेल्‍या श्री गोकुळाष्‍टमी उत्‍सवानिमित्‍त श्री साईबाबा समाधी मंदिरात श्रीकृष्‍ण जन्‍मोत्‍सव साजरा करण्‍यात आला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


श्री गोकुळाष्‍टमी उत्‍सवानिमित्‍त श्री साईबाबा समाधी मंदिरातील स्‍टेजवर दिनांक २६ ऑगस्‍ट रोजी रात्रौ १०.०० ते १२.०० यावेळेत ह.भ.प. सौ. प्रज्ञा देशपांडे पळसोदकर, पुणे यांचे श्रीकृष्‍णजन्‍म कीर्तन होवुन श्रीकृष्‍ण जन्‍मोत्‍सव साजरा करण्‍यात आला. यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, मंदिर प्रमुख विष्‍णु थोरात, ग्रामस्‍थ व साईभक्‍त मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. त्‍यानंतर श्रींची शेजारती झाली.

kamlakar


तसेच आज सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत श्री गोकुळाष्‍टमी उत्‍सवानिमित्‍त गेट क्र. ३ समोरील श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडपाचे स्‍टेजवर ह.भ.प. सौ. प्रज्ञा देशपांडे पळसोदकर, पुणे यांचे गोपालकाला किर्तन झाले. कीर्तनानंतर १२.०० वाजता समाधी मंदिरात श्री साईबाबांचे समकालीन भक्‍त तात्‍या पाटील कोते यांचे वंशज परीवारातील सदस्‍य श्री सर्जेराव अशोकराव पा. कोते यांच्‍या हस्‍ते दहीहंडी फोडण्‍यात आली.

यावेळी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, मंदिर विभाग प्रमुख विष्‍णु थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहीदास माळी, मंदिर पुजारी, कर्मचारी, शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने आयोजित केलेला श्री गोकुळाष्‍टमी उत्‍सव आनंदमय व भक्‍तीमय वातावरणात पार पडला.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button