Letest News
कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी शिर्डीत दिव्यांग स्वाभिमानाचा ऐतिहासिक विजय! आ. बच्चू कडूंचे दिव्यांगांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी मो... गुरुपौर्णिमा उत्सवात साईभक्तांची श्रद्धेची उधळण!श्री साईबाबा संस्थानला अवघ्या तीन दिवसांत ७.८१ कोटीं... शिर्डीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम: साई आश्रया अनाथालयातील मुलांना शैक्षणिक सा... गुरुपौर्णिमेत 'गावकरी गेट'वर संशयास्पद प्रवेशाचा खेळ? साईभक्त रांगेत… मग काहींना थेट प्रवेश कसा? धाडीनंतरही कायम अनुत्तरित प्रश्न साकुरी क्लबप्रकरणी 'मास्टरमाइंड' कोणाला वाचवले जात आहे? बोगस खात्यांच्या घोटाळ्यात मोठी कारवाई- आरोपी अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात!
राजकीयशिर्डी

“निष्ठावान कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये-भाजप सदैव त्यांच्या पाठीशी उभा आहे” – विधानपरिषदेचे सभापती प्रा. रामजी शिंदे

शिर्डी : भारतीय जनता पक्ष हा आपल्या जुन्या, निष्ठावान आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांचा पक्ष असून, कोणत्याही परिस्थितीत कार्यकर्त्यांनी खचून न जाता पक्षाच्या विचारांशी एकनिष्ठ राहून काम करत राहावे. भाजप आपल्या प्रत्येक निष्ठावान कार्यकर्त्याच्या पाठीशी आजही ठामपणे उभा आहे आणि भविष्यातही राहील, असा विश्वास विधानपरिषदेचे सभापती प्रा. रामजी शिंदे यांनी व्यक्त केला.
शिर्डी येथील भाजप नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांच्या निवासस्थानी झालेल्या सदिच्छा भेटीदरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधताना प्रा. शिंदे बोलत होते. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी पक्षनिष्ठा, संयम आणि सातत्यपूर्ण कार्य यालाच यशाचा खरा मंत्र असल्याचे सांगितले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


प्रा. रामजी शिंदे म्हणाले, “राजकारणात प्रत्येकाची वेळ येत असते. त्यामुळे कोणत्याही अडचणींना न घाबरता, निराश न होता आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता पक्षासाठी प्रामाणिकपणे कार्य करत राहणे हीच खऱ्या कार्यकर्त्याची ओळख आहे. भारतीय जनता पक्ष आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांना नेहमीच बळ देत आला असून भविष्यातही त्यांच्यासोबत खंबीरपणे उभा राहील.”


यावेळी डॉ. राजेंद्र पिपाडा यांचे वडील तथा प्रगतशील शेतकरी मदनलालजी पिपाडा यांनी शेती क्षेत्रातील अनुभव मांडत कृषीविषयक विविध मुद्द्यांवर प्रा. रामजी शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. बदलते कृषी तंत्रज्ञान, शेतकऱ्यांसमोरील आव्हाने आणि सहकार क्षेत्राची भूमिका यावरही मनमोकळा संवाद झाला.
होऊ घातलेल्या अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी प्रा. रामजी शिंदे यांना शुभेच्छा देत त्यांच्या यशासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.


यावेळी भाजप नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी प्रा. रामजी शिंदे यांचा शाल देऊन सन्मान केला.
या प्रसंगी शिर्डीचे माजी नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, प्रथम लोकनियुक्त माजी नगराध्यक्षा सौ. ममता पिपाडा, संघपती अनिल पिपाडा, माजी विश्वस्त सचिन तांबे, प्रगतशील शेतकरी मदनलालजी पिपाडा, भाजप पदाधिकारी नरेश सुराणा, चेतन कोते, श्रुती पिपाडा, साहील पिपाडा यांच्यासह अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button