Letest News
“दैवी शक्ती”च्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण! अशोक खरात प्रकरणात SITचा स्फोटक खुलासा लोणी पोलिसांच्या तपासाला मोठे यश! उर्वरित बोगस डॉक्टरांना कधी अटक होणार?” ⚠️ साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा-अन्यथा प्रशासन जबाबदार!” 🚨 “द्वारकामाईत साईभक्त अक्षरशः घामाघूम- राजेंद्र कोते पाटील यांची संस्थान प्रशासनाला भावनिक साद” राहात्यात पोलिसांचा धाक संपला? गुन्हेगार मोकाट-नगराध्यक्षांचा संताप शिर्डीत ‘MOBILEWALA’ चे दिमाखदार आगमन मोबाईल व होम अप्लायन्सेसच्या विश्वात नवा अध्याय सुरू आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी साई संस्थानचा मोठा आधार; मोफत निवासी CET कोचिंगची घोषणा शिर्डीत पर्यटकांच्या गाड्यांवर चोरट्यांचा डल्ला साईभक्ताची बॅग-मोबाईल आणि रोख रक्कम लंपास पोलीस असल्याची बतावणी-प्रेमसंबंधांचे आमिष अन् शिर्डीत अत्याचार? नांदगाव प्रकरणाने खळबळ “डेथ नेटवर्क”चा फैलाव? राहाता तालुक्यात गर्भलिंग रॅकेटची भीषण साखळी उघड होण्याची चिन्हे
अ.नगरक्राईम

रंगेल लिंगपिसाट ‘कॅप्टन खरातच्या भोंदूगिरी’चा स्फोट! फार्महाऊसवर चालायचे घाणेरडे खेळ CCTV मध्ये कैद संपूर्ण काळाकुट्ट अध्याय

केकाळी सावलीसारखा सोबत असलेला CA ललित पोफळेच आता खरातसाठी सर्वात मोठा डोकेदुखी ठरला आहे. आर्थिक फसवणुकीतून साडेतीन कोटींचा फटका बसल्यानंतर पोफळेचा ‘गुरूभक्ती’वरचा विश्वास पूर्णपणे ढासळला. यानंतर त्याने थेट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करत, आतापर्यंत दडवून ठेवलेले खरातचे काळे कारनामे एकामागून एक बाहेर काढले.
⚠️ फार्महाऊसवर ‘रंगेल रात्री’ – महिलांसोबत दारू, अश्लील कृत्यांचा उघडपणे खेळ
फिर्यादीतील धक्कादायक माहितीनुसार, खरात जेव्हा ‘थकत’ असे, तेव्हा तो थेट आपल्या फार्महाऊसवर मुक्कामाला जात असे. तिथे सलग दोन-दोन दिवस राहून काही महिलांना बोलावले जात असे. आतमध्ये दारूच्या पार्ट्या, अश्लील चाळे आणि आक्षेपार्ह कृत्यांचा उघडपणे खेळ रंगत असल्याचे स्पष्ट झाले आहे. श्रद्धा आणि अध्यात्माचा बुरखा घालून चाललेले हे कृत्य समाजाला हादरवणारे आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


📹 CCTV बंद करण्याचे आदेश, पण कुकनेच केला खेळ खल्लास!
खरात आपल्या कृत्यांचा मागमूस लागू नये म्हणून प्रत्येक वेळी CCTV कॅमेरे बंद करण्याचे आदेश देत असे. मात्र, पोफळेनेच आपल्या विश्वासातील तरुणाला ‘कुक’ म्हणून फार्महाऊसवर नेमले होते. हा कुक वरून आज्ञाधारक दिसत असला तरी आतून खरातच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत होता. त्याने CCTV बंद न करता सर्व कारनामे रेकॉर्ड होऊ दिले आणि याच फुटेजमुळे आज खरात अडचणीत सापडला आहे.
🕵️‍♂️ ‘इनसाईड ऑपरेशन’ने उघडला घोटाळा – ऑफिस बॉयपासून कुकपर्यंत सगळ्यांनी फोडले गुपित
खरातचे काळे धंदे उघड करण्यासाठी एकप्रकारे ‘इनसाईड ऑपरेशन’च राबवण्यात आले. आधी ऑफिस बॉयने माहिती बाहेर काढली, त्यानंतर कुकने फार्महाऊसवरील सर्व घडामोडींचा पुरावा गोळा केला. मंदिरात ‘चमत्कार’ दाखवणारा हा भोंदू प्रत्यक्षात लोकांना कसा फसवत होता, याचे अनेक पुरावे तपास यंत्रणांच्या हाती लागल्याची चर्चा आहे.


🚔 पोलिस तपासात नाटके – कधी डोकेदुखी, कधी ऑक्सिजन, आता ‘गजनी’चा बहाणा!
सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला खरात तपासात सहकार्य करत नसल्याचे समोर आले आहे. आधी डोकेदुखीचा बहाणा, त्यानंतर ऑक्सिजन लावून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न, आणि आता “मला काहीच आठवत नाही” असा ‘गजनी’ स्टाईल ड्रामा सुरू आहे. त्यामुळे तपास यंत्रणाही सावध झाल्या असून SIT पुन्हा कस्टडी घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.


⚖️ कोर्टाची कारवाई – 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष
खरातला कोर्टासमोर हजर करण्यात आल्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी महत्त्वाची ठरणार असून, SITकडून आणखी धक्कादायक पुरावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
👉 ‘गुरू’च्या नावाखाली चालणाऱ्या या काळ्या साम्राज्याचा शेवट जवळ आलाय का?
👉 CCTV फुटेजमध्ये अजून काय काय उघड होणार?
संपूर्ण राज्याचे लक्ष आता या प्रकरणाकडे लागले आहे… पुढे अजून मोठे स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button