Letest News
शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन
अ.नगरक्राईम

अशोक खरात प्रकरणात उज्ज्वल निकमांची एन्ट्री-विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

अंधश्रद्धा आणि तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात (Ashok Kharat Case) आता एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणाच्या कायदेशीर लढाईत आता देशातील नामांकित कायदेतज्ज्ञ आणि ज्येष्ठ वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची एन्ट्री (Adv. Ujjwal Nikam) झाली आहे.

sai nirman
जाहिरात

या हाय-प्रोफाइल खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी राज्य शासनाने उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील (Special Public Prosecutor) म्हणून अधिकृत नियुक्ती केली आहे. ॲड. निकम यांच्या एन्ट्रीमुळे या प्रकरणाशी संबंधित असलेल्या बड्या राजकीय नेत्यांचे आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.\\\\

DN SPORTS

kamlakar

स्वतःला सिद्धपुरुष आणि अंकशास्त्रज्ञ म्हणवून घेणारा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण राज्यभरात चर्चेत आले आहे. दैवी शक्तीची भीती दाखवून, गुंगीचे औषध देऊन आणि प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या पेढा किंवा पाण्यातून अंमली पदार्थ देऊन तो महिलांचे लैंगिक शोषण करायचा. याप्रकरणी पीडित महिलांच्या तक्रारीनंतर नाशिक पोलिसांनी खरातला अटक केली असून, या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून याचा तपास विशेष तपास पथकाकडे सोपवण्यात आला आहे. ‘एसआयटी’ने या प्रकरणाचा सखोल तपास करताना आरोपी अशोक खरात याच्या कार्यालय आणि फार्म हाऊसची कसून झडती घेतली. या कारवाईदरम्यान पोलिसांच्या हाती अत्यंत धक्कादायक पुरावे लागले आहेत. महिलांचे लैंगिक शोषण करतानाचे तब्बल 100 हून अधिक अश्लील व्हिडिओ पोलिसांना मिळून आले आहेत. यावरून खरातने अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढल्याचे स्पष्ट झाले आहे. खरातविरोधात लैंगिक अत्याचार, फसवणूक, ‘महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा’ अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button