Letest News
“गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट... मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे द... राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४९४१९ इतकी प्रकरणे निकाली आणि साधारणतः ४९ कोटी रुपयांची तडजोड शिर्डी विकास सोसायटीत ‘एकाच खुर्ची’चा बादशहा! सचिव बडे यांच्याविरोधात सभासदांचा एल्गार सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस
राजकीयशिर्डी

साईबाबा सुपर हाॅस्पिटल मध्ये तज्ञ डॉ सह केमोथेरपी सुविधाचा अभाव भाजपचे नेते डॉ राजेंद्र पिपाडा

शिर्डी प्रतिनिधी/ शिर्डी येथील साईबाबा सुपर व साईनाथ हॉस्पिटल मध्ये आठवड्यात एक दिवस कॅन्सर रोग तज्ञ डॉक्टर उपलब्ध असले तरी कॅन्सर आजाराची तीव्रता ज्या प्रमाणात आहे त्यासाठी केमोथेरपी करायची असेल तर यासाठी दोन्ही हॉस्पिटलचा समावेश महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत नसल्याने या मोफत आरोग्य सेवेचा लाभ रुग्णांना होत नसून त्यासाठी लागणारे तज्ञ डॉक्टर व बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत असल्याने ही सेवा त्वरित सुरू करण्यासाठी साईबाबा संस्थानच्या त्रिस्तरीय समितीने तात्काळ पुढाकार घेऊन हा प्रश्न जलदगतीने त्वरित मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी रुग्णाच्या नातेवाईकांन मधुन होत आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


शासनाने उदात्त हेतु ठेवून विविध वैद्यकीय सुविधा रुग्णांसाठी शासकीय योजनेत बसवून मोफत केलेले आहेत असे असताना साईबाबा हाॅस्पिटल मध्ये का केमोथेरपी सुविधा नाही हा मोठा प्रश्न आहे साई शताब्दी काळात दीडशे कोटी रुपये खर्चाच्या १०० बेड हॉस्पिटल, मनुष्यबळ व तज्ञ डॉक्टर यांच्या संदर्भात मागणी प्रस्ताव साईबाबा संस्थान पाठवलेला होता अशी चर्चा असली तरी जवळपास अनेक वर्ष उलटुन देखील काहीच हालचाल नसल्याने याचा फटका महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी व अतिदुर्गम भागातून शिर्डी येथील दवाखान्यात साईबाबावर विश्वास ठेवून वैद्यकीय सेवा घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना बसत असून त्यामुळे आर्थिक खर्चाबरोबरच मानसिक त्रास देखील सहन करावा लागत आहे

याबाबत साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांना विचारले असता याबाबत काय अडचणी आहेत याची माहिती घेतो असे सांगितले तसेच साईनाथ सुपर हॉस्पिटलचे वरिष्ठ अधिकारी डॉक्टर प्रीतम वडगावे यांना विचारले असता केमोथेरपी साठी हॉस्पिटलचा शासकीय योजनेत समावेश नसून त्यासाठी शताब्दी काळात प्रस्ताव पाठवलेला आहे

असे सांगत यासाठी तज्ञ डॉक्टर व मनुष्यबळ व १००बेडची गरज असून त्यासाठी साईबाबा संस्थानने १५० कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव देखील काही वर्षांपूर्वी पाठवलेला आहे असे सांगितले असे असले तरी साईबाबा संस्थाने या हॉस्पिटलमध्ये केमोथेरपी सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याची गरज असून त्यासंदर्भात तात्काळ कारवाई करण्याची मोठी गरज असल्याची भावना, रुग्णांमधून व्यक्त होत आहे

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button