Letest News
कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी शिर्डीत दिव्यांग स्वाभिमानाचा ऐतिहासिक विजय! आ. बच्चू कडूंचे दिव्यांगांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी मो... गुरुपौर्णिमा उत्सवात साईभक्तांची श्रद्धेची उधळण!श्री साईबाबा संस्थानला अवघ्या तीन दिवसांत ७.८१ कोटीं... शिर्डीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम: साई आश्रया अनाथालयातील मुलांना शैक्षणिक सा... गुरुपौर्णिमेत 'गावकरी गेट'वर संशयास्पद प्रवेशाचा खेळ? साईभक्त रांगेत… मग काहींना थेट प्रवेश कसा? धाडीनंतरही कायम अनुत्तरित प्रश्न साकुरी क्लबप्रकरणी 'मास्टरमाइंड' कोणाला वाचवले जात आहे? बोगस खात्यांच्या घोटाळ्यात मोठी कारवाई- आरोपी अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात!
अ.नगरक्राईम

घरकुल मंजुरीसाठी लाच मागणाऱ्यांवर सापळा- १० हजार घेताना रंगेहात अटक!

हिल्यानगर (दि. २० एप्रिल २०२६) : प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुल मंजुरीसाठी तब्बल १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या ग्रामसेविका व गृहनिर्माण अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी ग्रामपंचायत कर्जुने खारे येथील ग्रामसेविका पुष्पा डेरे (वर्ग ३) व पंचायत समितीतील कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता गौतम सूर्यवंशी यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तक्रारदाराच्या वडिलांनी सन २०२३ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज केला होता. २०२४ मध्ये नाव मंजूर होऊन स्टेट बँक ऑफ इंडिया खात्यात १५ हजार रुपयांचे अनुदान जमा झाले. मात्र, पुढील टप्पा-२ मंजुरीसाठी आरोपींनी प्रत्येकी ५ हजार रुपये अशी एकूण १० हजार रुपयांची लाच मागितली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. पडताळणी कारवाईत लाचेची मागणी स्पष्ट झाल्यानंतर सापळा रचण्यात आला.
सापळा कारवाईदरम्यान तक्रारदार आरोपी पुष्पा डेरे यांच्याकडे रक्कम देण्यासाठी गेले असता त्यांनी ती रक्कम गौतम सूर्यवंशी यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार निमगाव घाणा रोड, कर्जुने खारे येथे सूर्यवंशी यांनी तक्रारदाराकडून १० हजार रुपये स्वीकारताच, पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक छाया देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
📢 नागरिकांना आवाहन
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही लोकसेवक लाच मागत असल्यास त्वरित तक्रार करावी.


📞 संपर्क:
टोल फ्री – १०६४
व्हॉट्सअ‍ॅप – ९९३०९९७७०० / ९१६८६४१०६४
संकेतस्थळ – acb.maharashtra.gov.in
ही कारवाईमुळे घरकुल योजनांमधील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघड झाला असून, प्रशासनातील अशा प्रकारांवर कठोर कारवाईची गरज अधोरेखित झाली आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button