Letest News
दररोज ५०० रुपये द्या तरच दुकान चालवू देऊ!’ माजी नगरसेवकासह पाच जणांवर गुन्हा शिर्डीच्या अनाधिकृत बियर बार मध्ये मोठी धाडसात लाखाचे मध्यप्रदेशातिल दारू जप्त चेअरमन विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखाली साई संस्थान कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! दिवाळीनिमित्त शिधा व म... पैशांचा मोह नाही- कर्तव्याशी इमान! साई संस्थानच्या कर्मचाऱ्याचे कौतुक पादुका दर्शन सोहळ्यामुळे शिर्डीच्या दसरा-पुण्यतिथी उत्सवाला ग्रहण?अ‍ॅड. गोकुळ ठुबे यांची चौकशीची माग... प्रारंभ राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी भरती सुरू-पदवीधर तरुणांना रोजगाराची संधी! दहीहंडी फोडून श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता! रक्षाबंधनाच्या पवित्र नात्याला काळिमा नीच चैतन्य पाटीलच्या कृत्याचा काळा महिमा!! इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली मानसिक छळाचा ससेमिरा; दोघांवर गंभीर गुन्हा! शिर्डीत साईभक्त महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन ओरबाडल्याची धक्कादायक घटना समोर आली
राजकीयशिर्डी

साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकुट

शिर्डी | प्रतिनिधी
श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा आहे. या श्रद्धेतून भाविक आपल्या कुवतीनुसार श्री साईबाबांच्या चरणी विविध स्वरूपातील दान अर्पण करून आपली भक्ती व्यक्त करीत असतात. त्याच भक्तिभावातून दिल्ली येथील साईभक्त श्री. अमित बजाज यांनी श्री साईबाबांच्या चरणी आकर्षक नक्षीकाम असलेला चांदीचा मुकुट अर्पण केला.
या चांदीच्या मुकुटाचे वजन ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम असून त्याचे देणगी मूल्य १ लाख ६३ हजार २९६ रुपये आहे. सुंदर नक्षीकामाने साकारलेला हा चांदीचा मुकुट साईभक्तीची अनोखी भावना व्यक्त करणारा ठरला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केलेल्या या भक्तीपूर्ण देणगीबद्दल श्री साईबाबा संस्थानच्या वतीने प्रशासकीय अधिकारी संदिपकुमार भोसले यांनी साईभक्त श्री. अमित बजाज यांचा सत्कार करून त्यांच्या भक्तिभावाचे कौतुक केले.
श्री साईबाबांच्या चरणी अर्पण होणारे प्रत्येक दान हे भाविकांच्या श्रद्धा, विश्वास आणि समर्पणाचे प्रतीक मानले जाते. दिल्ली येथील साईभक्त अमित बजाज यांनी अर्पण केलेला हा चांदीचा मुकुटही साईभक्तीच्या याच भावनेची सुंदर अनुभूती देणारा ठरला.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button