Letest News
मध्यरात्री दरोड्याने थरकाप-अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाची दमदार कामगिरी – आंतरजिल... शिर्डीत ‘जमीन सौदा’ बॉम्ब फुटणार? भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरातच्या ५० कोटींच्या व्यवहारावर पोलिसांची ... पोटनिवडणुकीत माध्यमांवर कडक नियम-जाहिरातींसाठी पूर्व मंजुरी अनिवार्य नाशिक प्रकरणात खळबळ! भोंदू बाबा अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वाढ – ‘५ नरबळी’चा धक्कादायक संशय शिर्डीतील ‘क्लासिक आइसक्रीम’ची जागतिक भरारीकडे वाटचाल-नूतन आइसक्रीम युनिटचे भव्य उद्घाटन   ब्रेकिंग : ‘पेनड्राईव्ह’साठी रचला गेला मोठा कट-अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ  वाघचौरे यांना फसवण्याचा... सुपर ब्रेकिंग : ‘पेनड्राईव्ह’साठी रचला गेला मोठा कट asp वाघचौरे यांना फसवण्याचा प्रयत्न फसला! ६,५०० रुपयांच्या लाचेप्रकरणी जिल्हा परिषद अभियंता जाळ्यात! ACB ची धडक कारवाई शिर्डीत ११५ वा श्रीरामनवमी उत्सव-लाखो साईभक्तांच्या स्वागतासाठी भव्य तयारी पूर्ण! खरातचा काळा खेळ उघड! शिर्डी पोलिसांची गुप्त मोहीम ठरली निर्णायक
अ.नगरशिर्डी

तज्ञ भाषांतरकारांनी संस्थान कडे अर्ज करण्याचे साई संस्थांनचे आवाहन!!

शिर्डी (प्रतिनिधी)
संपूर्ण जगाला सर्वधर्मसमभावाची शिकवण व श्रद्धा सबुरीचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांच्या शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेतर्फे श्री साईबाबांच्या जीवन कार्याविषयी प्रचार व प्रसार करण्यासाठी तसेच साई संस्थांनमार्फत साई भक्तांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधा त्याचप्रमाणे साई संस्थांनच्या इतर उपक्रमाबाबत साई भक्तांना माहिती व्हावी,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

म्हणून साई संस्थान साई लीला हे द्वैमासिक सध्या मराठी आणि हिंदी -इंग्रजी (एकत्रित) या भाषांमध्ये प्रकाशित करण्यात येत आहे.
साई संस्थान व्यवस्थापनाने आता प्रकाशने विभागाकडे सन 1923 पासून उपलब्ध असलेल्या साईलीला या मराठी आणि हिंदी इंग्रजी (एकत्रित) हे द्विमासिक आवश्यकतेनुसार मराठी, हिंदी, इंग्रजी ,तेलगू या भाषेत भाषांतर करावयाचा मानस आहे. या कामी मराठी,

हिंदी, इंग्रजी, तेलुगू भाषेतील सेवाभावी तज्ञ भाषांतरकार यांच्याकडून स्वारस्यपत्र मागविण्यात येत आहेत. या कामे इच्छुक सेवाभावी साईभक्त भाषांतरकार यांनी आपले नाव ,पत्ता, संपर्क क्रमांक, शिक्षण ,कोणत्या भाषेत भाषांतर करण्यात इच्छुक आहात ,या भाषांतर क्षेत्रात असलेला अनुभव, या कामे विनामूल्य सेवा देण्यास तयार आहात किंवा कसे इत्यादी सविस्तर माहितीसह आपले स्वारस्यपत्र संस्थांनच्या- माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था ,शिर्डी .पोस्ट शिर्डी, जिल्हा अहिल्यानगर, महाराष्ट्र. पीन.नं. 42 3109 या पत्त्यावर लेखी स्वरुपात किंवा संस्थांनच्या प्रकाशाने विभागाच्या publication@sai.org.in


या ईमेल पत्त्यावर पाठवावे .या कामे अधिक माहितीसाठी साई संस्थांचे 0 24 23/ 25 88 00 व 25 88 08 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा .असे आवाहन श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे केले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button