Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
अ.नगरक्राईम

अनैतिक संबधास अडथळा ठरल्यानेप्रियकराच्या मदतीने पतीस केले ठार !

शिर्डी / प्रतिनिधी:
दिनांक 13/09/2025 रोजी इंदिरानगर पोलीस ठाणे, नाशिक शहर, गु.र.नं. 283/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103 (1), 61 (2) प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी श्री अशोक रामा काळे वय 55, रा. इंदिरागांधी वसाहत क्र. 01, स्टेट बँकेच्या पाठीमागे, शिवाजी चौक, सिडको, नाशिक यांचा मयत मुलगा संतोष अशोक काळे रा. सदर यास त्याची पत्नी पार्वती व तिचा प्रियकर प्रफुल्ल कांबळे अशांनी कट रचुन दगडाने खेचुन खुन केलेला असुन गुन्हा घडल्यानंतर आरोपी प्रफुल्ल कांबळे हा त्याचे साथीदारासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पळुन आलेला होता.
सपोनि हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी युनिट 2, गुन्हे शाखा, नाशिक शहर, पोउपनि संतोष फुंदे नेम – इंदिरानगर पोलीस ठाणे, नाशिक शहर यांचे पथकाने सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणेबाबत श्री किरणकुमार कबाडी, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना कळविले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि हरिष भोये, पोलीस अंमलदार विष्णु भागवत, किशोर शिरसाठ, सागर ससाणे, फुरकान शेख, प्रशांत राठोड यांचे पथक तयार करुन आरोपीचा शोध घेणेबाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना करण्यात आले. पथक दिनांक 13/09/2025 रोजी गुप्त बातमीदार व व्यवसायीक कौशल्याचे आधारे आरोपीची माहिती काढत असतांना आरोपी नामे प्रफुल्ल कांबळे हा नवनाथ नगर रोड, बोल्हेगांव गांवठाण या ठिकाणी थांबलेला असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सदर ठिकाणी जावून खात्री करता एक इसम संशयीत रित्या थांबलेला असल्याचे दिसले. सदर इसमास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव 1) प्रफुल्ल दिलीप कांबळे वय 30 वर्षे, रा. बोल्हेगांव गावठाण, ता. जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे वरील गुन्ह्याबाबत विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने विचारपुस करता त्याने सदर गुन्हा तो तसेच त्याचे साथीदारासह केल्याचे कळविल्याने त्यांचा शोध घेता 2) योगेश बाळासाहेब जाधव, वय – 23 वर्षे, रा. राममंदीराजवळ, बोल्हेगांव गावठाण, ता. जि. अहिल्यानगर हे मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ताब्यातील आरोपी व विधीसंघर्षीत बालक यांना इंदिरानगर पोलीस ठाणे, नाशिक शहर, गु.र.नं. 283/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103 (1), 61 (2) प्रमाणे गुन्ह्याचे तपासकामी इंद्रनगर पोलीस स्टेशन जि. नाशिक यांचे ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास इंदिरानगर पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button