Letest News
लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम शिर्डीत ‘4 एकर’चा स्फोटक घोटाळा-गहाण जमीन थेट विक्रीत-कोट्यवधींचा खेळ उघड! शिर्डीत श्री रामनवमी उत्सवाची भक्तीमय सांगता-दहिहंडी फोडत उत्सवाचा समारोप २ लाखांची लाच घेताना शिर्डीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रंगेहात- पुणे महसूल विभाग हादरला भोंदू बाबाशी नाव जोडल्याने केसरकर संतापले ‘राजकीय कट’ असल्याचा थेट आरोप!” “ओळख मान्य पण संबंध नाकारल...
अ.नगरराजकीय

मुंबई चर्चगेट येथील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचे विधी विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये चमकले!

शिर्डी( प्रतिनिधी)
आशिया व ऑस्ट्रेलिया या दोन्ही खंडांमध्ये असलेल्या सर्व देशांमधील  विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची इंटरनॅशनल ट्रेडमार्क असोसिएशन तर्फे घेण्यात येणाऱ्या  मूट कोर्ट कोंपीडिशन स्पर्धेमध्ये मुंबई चर्चगेट येथील गव्हर्नमेंट लॉ कॉलेज (शासकीय विधी महाविद्यालयातील) विशेष गुणवत्ता प्राप्त असे गौरव जितेश लोकचंदानी ,अवंती भंडारवार, मृदुल झंवर,व ऋतुजा तीकोटे यांच्या टीमने  या ट्रेडमार्क कायदेविषयक स्पर्धेत  मोठा विक्रम करत या स्पर्धेत टॉपच्या वीस संघामध्ये  येण्याचा किताब  मिळवला आहे .

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

त्यामुळे या मुंबईतील शासकीय विधी महाविद्यालयाच्या गौरव लोकचंदानी , अवंती भंडारवार,  मृदुल  झंवर व ऋतुजा  तीकोटे   या विधी विद्यार्थ्यांचे मुंबई चर्चगेट येथील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचे प्राचार्य सौ.अस्मिता वैद्य सो तसेच सर्व प्राध्यापक सो, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे .कौतुक होत आहे

.
    शासकीय विधी महाविद्यालयातील  हे भारतामधील एक प्रसिद्ध व अतिशय जुने असे जगप्रसिद्ध विधी महाविद्यालय आहे. अशा या विद्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जेष्ठ न्यायविधीतज्ञ् तथा सरकारी वकील उज्ज्वल निकम,राम जेठमालांनी, आदींनी विधी शिक्षण घेतल्याचे बोलले जाते.

अशा या कॉलेजमध्ये प्रवेश मिळणे मोठे कठीण असते. कारण या विधी महाविद्यालयात प्रवेश हा मोजक्या व भारतातील अतिशय हुशार  विद्यार्थ्यांनाच त्यांची परीक्षा घेऊन प्रवेश दिला जातो. असे टॅलेंट विद्यार्थी या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये शिकत असून विविध स्पर्धेतही ते नेहमी सहभाग घेत असतात. त्याचप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयातही महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच  प्रॅक्टिस करत असतात.

नुकतीच इंटरनॅशनल ट्रेडमार्क असोसिएशन यांनी आंतरराष्ट्रीय लेव्हलची स्पर्धा आयोजित केली होती. त्यामध्ये आशिया व ऑस्ट्रेलिया खंडातील सर्व देशातील विधी महाविद्यालयातील हुशार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विशिष्ट एखाद्या प्रकरणाची कायदेशीर व मुद्देसूद फाईल माननीय न्यायाधीश महोदयांकडे सुटसुटीतपणे व कायद्याचा अभ्यास करून सादर करण्यासंदर्भात ही एक विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चुणूक दाखवणारी स्पर्धा होती.

फाईल सादर करण्यासाठी 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत होती व त्यानंतर दहा डिसेंबर 2024 रोजी या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत अशा सहभागी झालेल्या टॅलेंट विद्यार्थ्यांच्या शेकडो टीम मधून या स्पर्धेत टॉप 20 च विद्यार्थ्यांच्या टीम काढल्या गेल्या. या वीस मध्ये गव्हर्नमेंट लॉ कॉलेज चर्चगेट मुंबई येथील गौरव जितेश लोकचंदानी, अवंती भंडारवार, मृदुल झंवर, ऋतुजा  तीकोटे  यांचीही टीम उत्कृष्ट काम केल्याबद्दल या स्पर्धेत टॉप ट्वेंटी मध्ये आली आहे ‌.

यानंतर दिल्ली येथे आठ व नऊ फेब्रुवारी 2025 रोजी या टॉप ट्वेंटी मधून परत स्पर्धा घेतली जाणार असून अंतिम विजेती टीम येथे घोषित होणार आहे . मात्र आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टॉप ट्वेंटी मध्ये येण्याचा मन मुंबई चर्चगेट येथील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजच्या या विद्यार्थ्यांना मिळाला आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांचे व या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button