Letest News
निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद “कायदा राखणारेच झाले लाचखोर!” — पाथर्डीत पोलीसांचा काळा चेहरा उघड “१० हजारांत पोटातील भविष्य विक्रीला!” — राहाता तालुक्यात गर्भलिंग निदानाचा काळाबाजार उघड जबरदस्ती धर्मांतराचा आरोप —आरोपी ताब्यात-विविध कलमांन्वये गुन्हा दाखल- शिर्डीत खळबळ- मुंबईच्या झोपडपट्टी दादाची शिर्डीत पेट्रोल पंपावर दादागिरी -शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल “९ नाण्यांचा वाद” पुन्हा पेटला — शिर्डीत संतापाची लाट-“भीती संपली म्हणून धंदा?” — ग्रामस्थांचा थेट स...
अ.नगरक्राईम

“पोलिसांच्या निष्क्रियतेने आणि राजकीय पाठबळामुळेच सचिन गिधेंचा जाळून खून! भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र पिपाडा आक्रमक

शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डीतील तरुण सचिन कल्याणराव गिधे याचा टायर व डिझेलच्या सहाय्याने जिवंत जाळून करण्यात आलेला निर्घृण खून हा केवळ एक गुन्हा नसून, तो पोलीस यंत्रणेच्या अपयशाचा, राजकीय वरदहस्ताचा आणि सत्ताधाऱ्यांच्या मौनाचा जळता पुरावा असल्याची तीव्र प्रतिक्रिया आता उमटू लागली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या प्रकरणात मोक्क्यातील सराईत गुन्हेगार दीपक अंबादास पोकळे याने उघडपणे कायद्याची थट्टा करत दहशतीचा कळस गाठला असून, हा खून पोलिसांच्या वेळकाढूपणामुळेच घडला असा थेट आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी केला आहे.


या गंभीर प्रकरणाकडे राज्याचे लक्ष वेधण्यासाठी मराठवाड्यातील भाजपाचे प्रभावी नेते आमदार सुरेश धस यांनी डॉ. पिपाडा यांच्या निवासस्थानी भेट देत निवेदन स्वीकारले. यावेळी प्रगतशील शेतकरी शिवाजी आनप, मदनलाल पिपाडा, नरेंद्र पिपाडा, महावीर पिपाडा, निखील पिपाडा, योगेश मुनावत, चेतन पिपाडा, रामदास येवले यांची उपस्थिती होती.\🚨

१५ वर्षांची गुन्हेगारी, तरीही मोकाट!
पोलीस झोपेत, गुंड राजरोस
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दीपक पोकळे हा गेल्या १५ वर्षांपासून राहाता, शिर्डी, कोपरगाव, संगमनेर तालुक्यांत खुलेआम दहशत माजवत आहे.
गरीब चहावाला दिनेश भडांगे याचा २०१४ मध्ये मुंडके छाटून खून, साकुरीतील हॉटेलमध्ये गोळीबार, १० लाखांची दरोडा चोरी, जीवे मारण्याचे हल्ले, हप्ते, अवैध वाळू उपसा — एवढा गुन्हेगारी इतिहास असलेला आरोपी आजपर्यंत प्रभावी कारवाईपासून वाचतोच कसा? हा प्रश्न आता जनतेतून विचारला जात आहे.


विशेष म्हणजे संगमनेर तालुक्यात चार महिन्यांपूर्वी केलेल्या खुनी हल्ल्यानंतरही आरोपीला अटक झाली नाही.
👉 जर त्यावेळी पोलिसांनी कर्तव्य बजावले असते, तर आज सचिन गिधे जिवंत असता!
🔥 अपहरण, जाळपोळ आणि निर्घृण हत्या


कायद्याचा मृत्यू, गुंडगिरीचा विजय?
१० डिसेंबर रोजी शिर्डीतून सचिन गिधे याचे अपहरण करून, टायर व डिझेलच्या सहाय्याने त्याला जिवंत जाळण्यात आले.
हा प्रकार इतका भीषण होता की, संपूर्ण शिर्डी हादरून गेली.
पोकळेने यापूर्वीही हजारो साईभक्तांच्या वाहनांवर दरोडे टाकले, मात्र “ठरावीकच गुन्हे दाखल” झाले —

👉 कोणाच्या आशीर्वादाने फाईल्स बंद पडल्या?
⚖️ राजकीय वरदहस्ताचा संशय – जनतेचा संताप उसळला
लोकप्रतिनिधी गप्प का?
निवेदनात थेट आरोप करत सांगण्यात आले आहे की,
शिर्डी मतदारसंघातील काही राजकीय नेत्यांचे पाठबळ असल्यामुळेच पोकळेला “आपले कोणीही काही वाकडे करू शकत नाही” असा माज चढला.
याच माजातून अपहरण, जाळपोळ आणि हत्या घडली.
आज सामान्य जनता विचारते आहे —
“आमचा जीव स्वस्त आहे का?”
✊ डॉ. राजेंद्र पिपाडा यांचा इशारा


“हा खून केवळ एका तरुणाचा नाही, तर कायद्याच्या अपयशाचा आहे.
दोषी पोलीस अधिकारी, गुंडाला पाठीशी घालणारे लोकप्रतिनिधी आणि आरोपी — सर्वांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.”
डॉ. पिपाडा यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,
सचिन गिधे कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आणि दोषींना फाशी समान शिक्षा होईपर्यंत हा लढा थांबणार नाही.
🩸 जनतेची एकच मागणी


“गुंडाला शिक्षा, पोलिसांना जाब, राजकीय मौनाला उत्तर!”
शिर्डी–राहाता परिसरात सध्या प्रचंड संतापाची लाट असून,
👉 या हत्येचा पूर्ण पर्दाफाश,
👉 मोक्का अंतर्गत कठोरात कठोर शिक्षा,
👉 निष्क्रिय पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई,
👉 आणि राजकीय पाठबळाची चौकशी
हीच एकमुखी मागणी जनतेतून होत आहे.

📰 — साईदर्शन न्यूज / SD News
🔥 “सत्ता, पोलिस आणि गुंडगिरीच्या साटेलोट्याविरोधात आवाज”

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button