Letest News
शिर्डीत रिक्षातून वृद्धाची लूट सराईत गुन्हेगार रहीम पठाणसह दोघांना २ दिवसांची पोलीस कोठडी समता घोटाळा : व्यवस्थापकाला पोलीस कोठडी आता 'मोठ्या माश्या'वर कारवाई कधी? शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा
शिर्डी

युरोपातील जर्मनी, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, रशिया, डेन्मार्क आदी देशातील विदेशी साई भक्तांची भेट!

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

शिर्डी येथे श्री साईबाबांच्या दर्शनाला देश विदेशातून साईभक्त नेहमी येत आज रविवारीही युरोपातील जर्मनी, स्वित्झर्लंड, ऑस्‍ट्रीया, रशिया, चेक व डेन्‍मार्क या देशांतील ३७ महिला व १५ पुरुष असे एकुण ५२ परदेशी साईभक्‍तांनी श्री साईबाबांच्‍या माध्‍यान्‍ह आरतीस उपस्थित राहून श्रींचे समाधीचे दर्शन घेतले. आरती नंतर साई संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी त्‍यांचा सत्‍कार करुन स्‍वागत केले.

kamlakar

यावेळी प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे, मंदिर प्रमुख रमेश चौधरी व जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते. तसेच यानंतर सर्व परदेशी साईभक्‍तांनी श्री साई प्रसादालयात भेट देऊन प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. यावेळी श्रीसाई प्रसादालय प्रमुख विष्‍णू थोरात उपस्थित होते. या विदेशी साईभक्तांनी शिर्डीला भेट देऊन साई दर्शन व प्रसादालयात प्रसाद भोजन घेऊन समाधान व्यक्त केले . एवढ्या मोठ्या विदेशी साई भक्तांना पाहून इतर साई भक्तांना व ग्रामस्थांनाही त्यांचे मोठे कुतूहल वाटत होते.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button