Letest News
समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप शिर्डी पोलिसांची दमदार कामगिरी!मंदिर परिसरातून बेपत्ता झालेली १२ वर्षीय चिमुरडी काही तासांत सुखरूप आ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे भाजप पदाधिकाऱ्यांची पाठ; विखे यांना कर्जतमध्येच धक्का? शिर्डीतील 'झिंग्या'वर एमपीडीएचा बुलडोझर- खून-अपहरण-मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची थेट नाशिक कारा... लेंडीबागेत नव्हे तर आरक्षित जागेवर उभारा भव्य श्रीराम-श्रीकृष्ण मंदिर! शिर्डी ग्रामस्थांचे साई संस्थ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी शिर्डी गुटखा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? थेट लोकायुक्त- एसीबी आणि आयुक्तांकडे धडक-एफडीए अधिकाऱ्यांच्या... शिर्डीचा विकास थांबवणारे नेमके कोण? — ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बनकर यांचा परखड सवाल
क्राईमशिर्डी

गुरुपौर्णिमेत मोठा दरोडा उधळला! शिर्डी रेल्वे स्टेशनजवळ दरोड्याच्या तयारीत असलेले ७ आरोपी शस्त्रांसह जेरबंद

शिर्डी (प्रतिनिधी) : गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त लाखो साईभक्त शिर्डीत दाखल होत असतानाच त्यांच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण करणारा दरोड्याचा कट स्थानिक गुन्हे शाखेने उधळून लावला. शिर्डी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यालगत रेल्वे ट्रॅकजवळ दरोड्याच्या तयारीत दबा धरून बसलेल्या सात आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने शस्त्रे व दरोड्याचे साहित्यांसह जेरबंद केले. तर अंधाराचा फायदा घेत दोन आरोपी पसार झाले. या कारवाईमुळे गुरुपौर्णिमेच्या गर्दीत साईभक्तांना लक्ष्य करण्याचा संभाव्य मोठा धोका टळला आहे.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या सातही आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास API कल्पेश चव्हाण करीत आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


गुप्त माहिती मिळताच पोलिसांचा सापळा
जिल्ह्यात दरोडा व जबरी चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष गस्त व कारवाईच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक शिर्डी परिसरात गस्त घालत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, काही संशयित इसम रेल्वे ट्रॅकजवळ एकत्र जमले असून दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत.
माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तात्काळ सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच संशयितांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून सात जणांना पकडण्यात यश मिळविले. दोन आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.


तलवार, चाकू, कटर, मिरची पावडरसह साहित्य जप्त
अटक केलेल्या आरोपींची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून एक लोखंडी तलवार, दोन धारदार लोखंडी चाकू, लोखंडी कटर, कटावणी, लाकडी गिलवर, नायलॉन दोरी, मिरची पावडर, तीन मोबाईल फोन तसेच रोख रक्कम असा एकूण १७ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जप्त करण्यात आलेल्या साहित्यावरून आरोपी कोणत्या उद्देशाने तेथे जमले होते, त्यांच्या निशाण्यावर नेमके कोण होते आणि यापूर्वी अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केले आहेत का, याचा तपास आता पोलिसांकडून करण्यात येत आहे.


चार दिवसांची पोलीस कोठडी; तपासाला वेग
या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६६९/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१० (४), ३१० (५), ३१० (६), ३१३ तसेच आर्म्स अॅक्ट कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक केलेल्या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या कालावधीत आरोपींची कसून चौकशी करून त्यांच्या टोळीतील इतर साथीदार, फरार झालेले दोन आरोपी, दरोड्याचा नेमका उद्देश आणि यापूर्वी केलेल्या गुन्ह्यांची माहिती उघड होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास API कल्पेश चव्हाण करीत असून, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली आहेत.


गुरुपौर्णिमेच्या गर्दीत मोठा धोका टळला
गुरुपौर्णिमा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत देशभरातून लाखो साईभक्त दाखल झाले होते. रेल्वे स्टेशन परिसर, बसस्थानक, बाजारपेठ आणि मंदिर परिसरात मोठी गर्दी असताना रेल्वे ट्रॅकजवळ शस्त्रांसह संशयितांची टोळी दरोड्याच्या तयारीत असल्याचे समोर आल्याने सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मात्र, स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीवर तातडीने कारवाई करून सात आरोपींना शस्त्रांसह पकडण्यात आल्याने संभाव्य मोठा दरोडा टळल्याचे मानले जात आहे. आता पोलिसांच्या तपासात या टोळीचा आणखी कोणता गुन्हेगारी इतिहास समोर येतो, याकडे शिर्डीकरांचे लक्ष लागले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे व त्यांच्या विशेष पथकाने केली.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button