Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
अ.नगरराजकीय

डॉक्टर पंकज आशिया हे नगरचे जिल्हाधिकारी शिर्डी संस्थान वरही त्रिसदस्य समितीत सदस्य राहणार!

शिर्डी (प्रतिनिधी)-
अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारीपदी डॉ.पंकज आशिया यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे.यवतमाळ जिल्हाधिकारी पदावरून त्यांची अ,नगरला बदली झाली आहे. आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानवर सध्या त्रिसदस्यीय समिती कार्यरत असून त्यामध्ये जिल्हाधिकारी हे सदस्य असतात.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

त्यामुळे
अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची बदली होऊन त्यांच्या जागेवर जिल्हाधिकारी म्हणून डॉक्टर पंकज आशिया हे आले आहेत. त्यामुळे ते श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या त्रिसदस्यीय समितीवर सदस्य असणार आहेत.
डॉ. पंकज आशिया हे जोधपूर (राजस्थान) येथील मूळ रहिवासी आहेत.

त्यांचे वडील डॉक्टर तर आई गृहिणी आहे. त्यांनी डॉक्टर व्हावे अशी वडीलांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पदवी घेतली. त्यानंतर यूपीएससीचा अभ्यास सुरू केला. पहिल्याच प्रयत्नामध्ये ते यूपीएससी उत्तीर्ण झाले होते.मात्र त्यांना अपेक्षित असलेली आय.ए.एस.ची रँक मिळाली नव्हती. तिसऱ्या प्रयत्नांत ते आय. ए. एस. झाले.

त्यांनी कोणताही खासगी क्लास न लावता स्वयंम अभ्यास करून हे यश संपादन केले. आशिया हे २०१६ बॅचचे आय. ए. एस. अधिकारी आहेत. देशात ५६ वी रँक त्यांनी मिळविली आहे. त्यांनी मालेगाव (नाशिक) येथे प्रांताधिकारी म्हणून काम करताना शहर कोरोनामुक्त करण्यासाठी राबविलेल्या उपक्रमाचे राज्यभर कौतुक झाले होते.

त्यांच्या कार्याची दखल घेऊन भिवंडी महानगरपालिकेत आयुक्त म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आले होते. जळगाव जिल्हा परिषदेचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही कार्यरत होते तेथे जिल्ह्याच्या ग्रामीण विकासावर त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यानंतर त्यांची यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली.

यवतमाळ येथे जिल्हाधिकारी ते होते. व आता त्यांची बदली यवतमाळ वरून अहिल्यानगर येथे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे. त्यामुळे शिर्डी येथील साई संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या त्रिसदस्यीय समितीवरही ते सदस्य राहणार आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button