Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
राजकीयशिर्डी

साईबाबांच्या चरणी विधानपरिषद अध्यक्ष राम शिंदे समाधी दर्शनानंतर संस्थानकडून सत्कार

शिर्डी : महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे अध्यक्ष राम शिंदे यांनी आज शिर्डी येथे श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन साईचरणी नतमस्तक झाले. समाधी मंदिरात त्यांनी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करत राज्याच्या प्रगतीसह सर्वसामान्य जनतेच्या सुख-समृद्धीसाठी आशीर्वाद मागितला.
दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी श्री शिंदे यांचा श्री साईबाबांची प्रतिमा व शाल देऊन सन्मानपूर्वक सत्कार केला. यावेळी संस्थानच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत करत संस्थानच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


शिर्डीत येणाऱ्या लाखो साईभक्तांप्रमाणेच राज्यातील विविध मान्यवरही वेळोवेळी साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात. श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर राम शिंदे यांनी समाधी मंदिरातील भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेत साईचरणी कृतज्ञता व्यक्त केली.
शिर्डीतील त्यांच्या भेटीमुळे मंदिर परिसरात भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. श्री साईबाबांच्या कृपेने राज्यात शांतता, समृद्धी आणि जनकल्याण नांदो, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button