Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
राजकीयशिर्डी

गोडबोले शब्द-प्रेमळ आठवणी… स्व. हरिभाऊ जगताप आजही निमगावच्या मनात जिवंत-द्वितीय स्मृतीदिनानिमित्त श्रद्धांजली कार्यक्रम उद्या

निमगाव (ता. राहाता) | प्रतिनिधी
निमगाव येथील दिवंगत स्व. हरिभाऊ तुळशीराम जगताप यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त श्रद्धांजली कार्यक्रम उद्या शनिवार दि. १० जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, निमगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
स्व. हरिभाऊ जगताप हे गोडबोले, मनमिळावू व प्रेमळ स्वभावाचे व्यक्तिमत्त्व म्हणून संपूर्ण परिसरात परिचित होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

कोणताही भेदभाव न करता सर्व समाजाला एकत्र घेऊन चालणारे सामाजिक कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. गावातील सामाजिक, सांस्कृतिक तसेच अडचणीच्या प्रसंगी ते नेहमी पुढे असायचे. त्यांच्या शब्दात मृदुता होती, पण विचारात ठामपणा होता.
समाजसेवेबरोबरच त्यांनी आपल्या कुटुंबालाही संस्कारांची शिदोरी दिली. आपल्या मुलांना प्रामाणिकपणा, कष्टाची जाणीव आणि समाजभानाचे संस्कार त्यांनी लहानपणापासून दिले. त्यामुळेच आज त्यांची मुले व कुटुंबीय समाजात सन्मानाने व जबाबदारीने वावरताना दिसतात, असे भावनिक उद्गार ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहेत.


त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, नातवंडे असा मोठा परिवार असून, त्यांच्या आठवणी आजही निमगावच्या प्रत्येक घरात जिवंत आहेत. त्यांच्या जाण्याने समाजात निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
तरी या स्मृतीदिन कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्व. हरिभाऊ तुळशीराम जगताप यांना आदरांजली अर्पण करावी, असे आवाहन समस्त जगताप परिवार, निमगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या श्रद्धांजली कार्यक्रमास आयु. चंद्रभागा हरिभाऊ जगताप (पत्नी), आयु. विजय हरिभाऊ जगताप (मुलगा), आयु. ज्ञानदेव हरिभाऊ जगताप (मुलगा) यांच्यासह नातवंडे, नातसून, आप्तेष्ट, ग्रामस्थ, मित्रपरिवार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.पंचक्रोशीतील विविध क्षेत्रांतील मान्यवर, ग्रामस्थ, मित्रपरिवार, हितचिंतक व आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, स्व. हरिभाऊ जगताप यांच्या कार्याचा व व्यक्तिमत्त्वाचा गौरव करण्यात येणार आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button