Letest News
नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका...
क्राईमशिर्डी

शिर्डीत भाविकांची बॅग लुटणारे गजाआड!परकीय चलनासह 60 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शिर्डी | प्रतिनिधी – साईदर्शन न्यूज
शिर्डी साईबाबा मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दोन तरुण आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरने श्रीरामपुर शहरात अटक करत त्यांच्याकडून परकीय चलनासह सुमारे 60,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याने भाविकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे.
भक्तीनिवासात बॅग ठेवताच लंपास
मोबाईल, भारतीय व अमेरिकन चलनावर डल्ला
या प्रकरणातील फिर्यादी पुजिता गोविंद रेड्डी (वय 25, रा. रायचूर, कर्नाटक) हे कुटुंबासह दि. 24 डिसेंबर 2025 रोजी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आले होते. दर्शनानंतर साईबाबा संस्थानच्या भक्तीनिवास क्रमांक 500 च्या गेटजवळ त्यांनी बॅग ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी ती बॅग लंपास केली.
या बॅगेत
▪️ मोबाईल फोन
▪️ भारतीय व अमेरिकन चलन
▪️ आधार कार्ड
▪️ दोन क्रेडिट कार्ड
असा एकूण 60,000 रुपयांचा मुद्देमाल होता.
या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा र. नं. 1040/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वारंवार चोरीच्या घटनांमुळे LCB अलर्ट
पोलीस अधीक्षकांचे स्पष्ट आदेश
शिर्डी परिसरात बॅग चोरीच्या घटना वाढत असल्याने पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री. सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला अशा गुन्ह्यांचा छडा लावण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
या पथकात
पोलीस उपनिरीक्षक दिपक मेढे,
पोलीस अंमलदार राहुल द्वारके, भिमराज खर्से, राहुल डोके, सतीश भवर,
वाहनचालक भगवान धुळे यांचा समावेश होता.
गोपनीय माहितीच्या आधारे श्रीरामपुरात सापळा
दोन संशयित ताब्यात, गुन्ह्याची कबुली
दि. 7 जानेवारी 2026 रोजी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे सदर गुन्हा श्रीरामपुर परिसरातील दोघा तरुणांनी केला असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने तात्काळ अशोकनगर, श्रीरामपुर परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
ताब्यातील आरोपींची नावे
आशिष रविंद्र मंगलम (वय 20, रा. अशोकनगर, श्रीरामपुर)
विठ्ठल संजय शेलार (वय 20, रा. निपाणीवडगाव, ता. श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर)
अशी असल्याचे निष्पन्न झाले.
आयफोनसह परकीय चलन जप्त
60 हजारांचा मुद्देमाल हस्तगत
दोन्ही आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून
▪️ 50,000 रुपयांचा आयफोन
▪️ 10,000 रुपये रोख (परकीय चलनासह)
असा एकूण 60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ताब्यातील आरोपींना मुद्देमालासह शिर्डी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास शिर्डी पोलीस करत आहेत.
भाविकांत समाधान
LCB कारवाईचे कौतुक
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केल्याने शिर्डी परिसरातील भाविक व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. साईनगरीत चोरी करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा या कारवाईतून मिळाल्याचे बोलले जात आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button