Letest News
“गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट... मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे द... राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४९४१९ इतकी प्रकरणे निकाली आणि साधारणतः ४९ कोटी रुपयांची तडजोड शिर्डी विकास सोसायटीत ‘एकाच खुर्ची’चा बादशहा! सचिव बडे यांच्याविरोधात सभासदांचा एल्गार सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस
अ.नगरराजकीय

वैद्यकीय पदवी ही स्वतः बरोबरच दुसऱ्याच्या कल्याणासाठी ही हवी–आ. प्रशांत बंब

डॉक्टर ही डिग्री मिळाल्यानंतर स्वत:च्या कल्याणाबरोबरच जनतेच्या कल्याणासाठीही आपले जीवन खर्ची घातले पाहिजे असे आवाहन आमदार प्रशांत बंब यांनी शिर्डी उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थीनींना केले. शिर्डी येथे अटल बिहारी वाजपेयी होमिओपॅथिक मेडीकल कॉलेज व हॉस्पिटल येथील प्रथम वर्षाच्या बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी स्नेह सम्मेलनाचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


शिर्डी येथे अटल बिहारी वाजपेयी होमिओपॅथिक मेडीकल कॉलेज व हॉस्पिटल येथील प्रथम वर्षाच्या बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी स्नेह सम्मेलनाचा शुभारंभ आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते कऱण्यात आले. आमदार प्रशांत बंब व डॉ.राजेंद्र पिपाडा,प्रशांतजी देसरडा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा, अटल बिहारी वाजपेयी होमिओपॅथिक मेडीकल कॉलेजचे अध्यक्ष प्रशांत देसरडा,नंदुशेठ लोढा,राखी देसर्डा,संजय लोढा तसेच कॉलेजचे शिक्षक वृंद व विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.
यावेळी आमदार प्रशांत बंब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.ते बोलतना म्हणाले की प्रत्येकाच्या जिवनात देव आयुष्याचे सोन कऱण्यासाठी एक संधी देत असतो त्या संधीचे सोने करणे गरजेचे आहे.

माझे नावकरी या संस्थेचे प्रशांत देसरडा यांनी ही संधी आपल्याला उपलब्ध करुन दिली आहे असे मला वाटते. प्रत्येकाच्या जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर होणे म्हणजे जिवनातील प्रत्येक गोष्ट कऱण्यासाठी स्टेज उपलब्ध होते. कोणताही रोग मुळासकट मिटवण्याची ताकद होमिओपॅथीमध्ये आहे.

प्रॅक्टीस चालू असताना स्वत:च्या कल्याणाबरोबर दुस-याचे कल्याण केले पाहिजे. तुमचा हा पुढील कार्यक्रम माझ्या मतदार संघात म्हैसमाळ ला घेईल असा मी आपल्याला शब्द देतो. मी माझ्या मतदार संघात कोणत्याही लग्न कार्याला हजेरी न लावता विकास कामांना प्राधान्य देवुन जनतेची कामे केली व गोरगरीबांसाठी महाराष्ट्रात सर्वांत जास्त योजना राबविल्या म्हणून मतदारसंघातील सर्वसामान्य लोक आमच्या बाजूने आहेत.

माझ्याकडे कोणतेही ह़ॉस्पीटलचे काम घेवुन या गरजुवंतांसाठी स्व:तची यंत्रणा उभी केली आहे.
यावेळी स्नेह सम्मेलनाचे अवचित साधून विद्यार्थी-विद्यार्थीनी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.
चौकट-
माझ्या मतदार संघात 220 गावे असुनही इतकी मोठी गावांची संख्या असतानाही प्रत्येक गावात मी प्रचंड विकास केलेला आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button