Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
अ.नगरक्राईम

समता नागरी पतसंस्थेवर आर्थिक घोटाळ्याचे गंभीर आरोप-ठेवी सुरक्षित नसल्याच्या भीतीने सभासदांमध्ये घबराट-श्रीरामपूर शाखेत गर्दी

कोपरगाव | प्रतिनिधी :
कोपरगाव येथील राजकीय व सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले काका कोयटे यांच्या नेतृत्वाखालील समता नागरी पतसंस्था सध्या गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडली असून, संस्थेवर थेट आर्थिक गैरव्यवहार व घोटाळ्याचे आरोप झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. काही कर्जदारांनी उघडपणे केलेल्या आरोपांमुळे संस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ठेवीदारांमध्ये आपल्या आयुष्यभराच्या कष्टाचे पैसे सुरक्षित आहेत की नाही, याबाबत तीव्र संभ्रम आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.

sai nirman
जाहिरात

या आरोपांचा थेट फटका श्रीरामपूर येथील समता नागरी पतसंस्थेच्या शाखेला बसल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. पतसंस्थेबाबत सुरू असलेल्या नकारात्मक चर्चांमुळे आणि घोटाळ्याच्या गंभीर आरोपांमुळे घाबरलेल्या सभासदांनी मोठे पाऊल उचलत आपल्या ठेवी काढून घेण्यासाठी शाखेकडे धाव घेतली. सकाळपासूनच शाखेसमोर सभासदांची अक्षरशः गर्दी उसळली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकाच दिवसात लाखो रुपयांच्या ठेवी काढून घेतल्या गेल्या, त्यामुळे पतसंस्थेची आर्थिक स्थिती आणि तरलतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. “आज पैसे नाही काढले, तर उद्या मिळतील की नाही?” या भीतीपोटी अनेक सभासदांनी दीर्घकाळासाठी ठेवलेली बचतही तातडीने काढून घेतल्याचे समजते.

DN SPORTS

काका कोयटे यांच्या नेतृत्वाखालील ही पतसंस्था वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने, प्रशासन, सहकार विभाग आणि तपास यंत्रणा यांची पुढील भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरोपांची चौकशी होणार का? दोषींवर कारवाई होणार का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ठेवीदारांचे पैसे सुरक्षित राहणार का? – हे प्रश्न सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरले आहेत.

या प्रकरणाचे पुढील पडसाद सहकार क्षेत्रात मोठ्या हालचाली घडवू शकतात, अशी शक्यता व्यक्त होत असून, समता नागरी पतसंस्थेच्या भवितव्याबाबत अनिश्चिततेचे सावट अधिक गडद होत चालले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button