Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
अ.नगरराजकीय

साई संस्थानच्या कामगार अधिकार पदी शरदराव डोखे यांची निवड झाल्याबद्दल अमरदीप संघटने तर्फे अभिनंदन करत सत्कार!

शिर्डी( प्रतिनिधी ) संपूर्ण विश्वाला सर्व धर्म समभाव व श्रद्धा सबुरीचा संदेश देणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या कामगार अधिकारी यापदावर शरदराव रामभाऊ डोखे यांची नुकतीच बदली होवून त्यांना बढती मिळाल्याबद्दल त्यांचा राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे मूळ गावी अमरदीप संघटनेच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच ओमेश जपे हे होते. तर या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून पंचायत समितीचे माजी सभापती जिजाबा आगलावे, राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शांताराम जपे, उपसरपंच विकास जपे, त्याचप्रमाणे अमरदीप संघटनेचे अध्यक्ष संतोष पळसे, व सर्व पदाधिकारी, मान्यवर, ग्रामस्थ साई संस्थानचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
प्रथम जिजाबा आगलावे यांनी शरदराव डोखे हे अमरदीप संघटनेचे संस्थापक सदस्य असून येथूनच त्यांनी शिक्षण घेऊन नोकरी आरंभ केली. व ते आज देशातील मोठ्या अशा साई संस्थांनमध्ये उच्च पदावर कामगार अधिकारी झाल्याने गावाला व अमरदीप संघटनेला मोठा आनंद आहे. त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा आहेत. असे यावेळी सांगितले. यावेळी सरपंच ओमेश जपे यांनीही शरदराव डोखे हे लहानपणापासून सावळीविहीर बुद्रुक मध्ये वास्तव्यास होते. त्यांचे मामा कै. भीमराव जाधव यांच्या मार्गदर्शन व संस्कारामुळे डोखे परिवार सुसंस्कृत व सुशिक्षित झाला. त्यांचा हा संस्कृतपणा, सुशिक्षितपणा व प्रामाणिकपणा आजही गावाला अभिमान वाटणारा आहे. असे सांगत पुढील कार्याला त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी शांताराम जपे यांनी शरदराव डोखे हे पूर्वीपासून अमरदीप संघटनेचे सदस्य असून विविध सामाजिक कार्यात त्यांनी मोठा सहभाग घेतला .राजकीय क्षेत्रातही त्यांची नेहमी यापूर्वी आम्हाला मदत मिळत गेल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी सुनील आगलावे यांनीही शरद डोखे हे आमचे लहानपणापासूनचे मित्र असून संस्थांनमध्ये ते कामगार अधिकारी बनले .याबद्दल आम्हाला सर्वांना खूप मोठा अभिमान आहे. असे सांगत त्यांना शुभेच्छा दिल्या. यानंतर शरदराव डोखे यांचा अमरदीप संघटनेच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान सत्कार करण्यात आला. तसेच साई संस्थांनचे सावळीविहीर बु.येथील कर्मचारी यांनी त्यांचा सत्कार केला तसेच उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने, मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शरदराव डोखे यांनी हा माझा सन्मान हा घरचा सन्मान आहे. या गावात, या संघटनेत मी राहिलो ,खेळलो, वागलो. याच संघटनेच्या वतीने माझा सन्मान होतो. हा खरच मला घरातल्या सारखा वाटत असून सर्वांचे मी आभार मानतो. या पदामुळे व सत्कारामुळे मला आणखी प्रेरणा, ऊर्जा मिळाली. मी यापुढे आणखी चांगले ,प्रामाणिक व साईबाबांची सेवा म्हणून अधिकाधिक चांगले काम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपस्थित सर्वांनी शरदराव रामभाऊ डोखे यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला बाबासाहेब जपे, पत्रकार राजकुमार गडकरी, शिवाजी आगलावे, ग्रामपंचायत सदस्य आनंद जपे, दत्तू आगलावे, किरण राजेंद्र आगलावे,
शरदराव जपे, शिवाजी आदमने,कैलास पळसे, निलेश आरणे ,प्रमोद कोपरे, सुधीर कामठे, बाळासाहेब विनायक जपे, राजेंद्र कापसे, विक्रम आगलावे, रावसाहेब एखंडे, दिलीपराव रक्ताटे, महाले, साई संस्थांनचे सुनील गायकवाड, राजाराम साळवे, शशिकांत वाघमारे, बाबासाहेब पगारे, सुशांत पवार, प्रबोधर पठारे, निलेश आरणे, सचिन आगलावे, सागर आरणे, आदींसह अमरदीप संघटनेचे सर्व पदाधिकारी, व युवक, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button