Letest News
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी साई संस्थानचा मोठा आधार; मोफत निवासी CET कोचिंगची घोषणा शिर्डीत पर्यटकांच्या गाड्यांवर चोरट्यांचा डल्ला साईभक्ताची बॅग-मोबाईल आणि रोख रक्कम लंपास पोलीस असल्याची बतावणी-प्रेमसंबंधांचे आमिष अन् शिर्डीत अत्याचार? नांदगाव प्रकरणाने खळबळ “डेथ नेटवर्क”चा फैलाव? राहाता तालुक्यात गर्भलिंग रॅकेटची भीषण साखळी उघड होण्याची चिन्हे पोलीस ठाण्यातही लिंगपिसाट भोंदू खरातचा माज साक्षीदारांनाच दिली दमदाटी! भोंदू खरातचा जेलमधील मुक्काम वाढला-कोर्टाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी राहात्यात गर्भलिंग रॅकेटचा महाभंडाफोड-पुण्यापर्यंत पोहोचले धागेदोरे- राहता तालुक्यातील “मोठे मासे” र... साईदरबारात पुन्हा दिसली प्रामाणिकतेची झलक-१५ हजारांची पर्स साईभक्ताला सुखरूप परत इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैनस्नॅचिंग-श्रीरामपूरची टोळी जेरबंद-LCB ची धडाकेबाज कारवाई पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ
क्राईमशिर्डी

साईभक्तांना बंदुकीचा धाक दाखवत केली लूटमार साईभक्त व वाहनधारकांमध्ये खळबळ!

शिर्डी (प्रतिनिधी)
साईभंक्ताचे वाहन आडवून बंदूक आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवत लूटमार केल्याची धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात रविवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

त्यामुळे वाहनधारक व साई भक्तांमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत .या घटनेने कोपरगाव तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

सध्या अहिल्यानगर जिल्ह्यात गुन्हेगारीने कळस गाठला असून आता थेट साई भक्तांचे वाहन अडून त्यांना बंदूक आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवून लूटमार झाली आहे. शिर्डीत दुहेरी हत्याकांड, चाकू हल्ला, गावठी कट्टे बाळगणाऱ्या अटक, असे गुन्हे नुकतेच घडले असताना व पोलिसांनी कडक वातावरण निर्माण केले असतानाही असे गुन्हेगारीचे प्रकार घडत असतील तर याला पाय बंद कसा बसणार? असा सवाल आता होत आहे.


शिर्डीतील अवैध धंदे ,गुन्हेगार यांची धरपकड सुरू असल्यामुळे हे परिसरात पसार झाले आहेत. व आता ग्रामीण भागात वेगवेगळ्या मार्गाने चोऱ्या करत आहेत. लुटमार करत आहेत.
गुजरात राज्यातील सुरत येथील रहिवाशी मोहित पाटील हे आपल्या सहकार्यांसोबत ईरटीका गाडीतून शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी चालले होते.

लासलगाव मार्गे कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात आली असता दुसऱ्या एका चार चाकी वाहनातून आलेल्या सात ते आठ जणांनी ओव्हरटेक करत पाटील यांची गाडी थांबवली. चालकाला गाडीची काच खाली घ्यायला लावत तुला गाडी नीट चालवता येत नाही का?

असं म्हटलं त्यानंतर झगडा घालत गाडीची काच फोडली आणि त्यानंतर शस्त्राचा धाक दाखवत या गाडीतील साई भक्तांना लुटले . यावेळी आरोपींनी हातातील बंदूक आणि धारदार शास्त्राचा धाक दाखवत ही लूटमार केली आहे. मोहिते पाटील व त्यांच्या मित्रांकडील सोन्या-चांदीचे दागिने मोबाईल आणि रोख रक्कम असा एक लाख आठशे रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले.

या प्रकरणी मोहित पाटील यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात आठ जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन भेट दिली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button