Letest News
साई निर्माण ग्रुपच्या संकल्पपूर्ती तीर्थयात्रेचा भक्तिमय सोहळा- साई निर्माण ग्रुप व विजयराव कोते यां... पोटची मुलगी गमावली-अनाथ मुलीला घेतले दत्तक… अर्धी संपत्ती तिच्या नावे! अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वा... सुमन काळे कोठडी मृत्यूप्रकरणाची फाईल पुन्हा उघडणार!१९ वर्षांच्या न्यायसंघर्षाला नवी दिशा तलाठी भरतीतील भ्रष्टाचारावर रोहित पवारांचा विखेंवर थेट हल्लाबोल ‘राजीनामा आधी द्या-मग पवारांवर बोला!... शिर्डी संस्थानमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात गोरक्ष गाडीलकरांच्या हस्ते ध्वजारोहण राष्ट्रीय महामार्गांवरील अतिक्रमणांवर आता बुलडोझर ६० दिवसांत कारवाईचे आदेश शिर्डी नगरपरिषदेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा नगराध्यक्ष जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण शिर्डीत मटक्याचा सुळसुळाट! टपरीच्या आडोशाला ‘कल्याण’चा डाव पोलिसांचा छापा एक जेरबंद विठ्ठल पवारवर ३३ लाखांच्या आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल! बनावट सह्या करून संस्थेला लाखोंचा गंडा भाविक सेवेत SBIची ‘साईसेवा’ ६९ लाखांचे अत्याधुनिक डिश वॉशिंग मशीन देत जपली सामाजिक बांधिलकी!
राजकीयशिर्डी

गुरुपौर्णिमा उत्सवात साईभक्तांची श्रद्धेची उधळण!श्री साईबाबा संस्थानला अवघ्या तीन दिवसांत ७.८१ कोटींची देणगी ३ लाखांहून अधिक भाविकांनी घेतले साईदर्शन

साईदर्शन
शिर्डी (प्रतिनिधी) : श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांच्या वतीने दि. २८ ते ३० जुलै २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाला देश-विदेशातील साईभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अवघ्या तीन दिवसांच्या उत्सवात ₹७ कोटी ८१ लाख १३ हजार ३७७ रुपयांची देणगी संस्थानला प्राप्त झाली असून, ३ लाखांहून अधिक साईभक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन गुरुकृपेचा लाभ घेतला, अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
प्राप्त देणगीमध्ये दक्षिणापेटीतून ₹२ कोटी ४ लाख ३५ हजार ५५७, देणगी काउंटरवर ₹१ कोटी २५ लाख ४७ हजार ९३५, तर डेबिट-क्रेडिट कार्ड, ऑनलाइन देणगी, धनादेश, डिमांड ड्राफ्ट, मनीऑर्डर आणि पीआरओ देणगीसह विविध माध्यमांतून मोठ्या प्रमाणावर देणगी प्राप्त झाली. परकीय चलनाद्वारे ₹५ लाख ६५ हजार ९९१ इतकी देणगी मिळाली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


याशिवाय, साईभक्तांनी १,१२५.५७० ग्रॅम सोने अर्पण केले असून त्याची अंदाजित किंमत ₹१ कोटी ४६ लाख ७४ हजार ५४४ इतकी आहे. तसेच २,३७६.५०० ग्रॅम चांदी प्राप्त झाली असून तिचे मूल्य ₹३ लाख ९० हजार ६४९ इतके आहे. श्रद्धा, विश्वास आणि समर्पणाचे हे दर्शन गुरुपौर्णिमा उत्सवात पुन्हा एकदा पाहायला मिळाले.
उत्सव काळात श्री साईप्रसादालयामध्ये १ लाख ९४ हजार २८५ साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला, तर ३९ हजार ६११ अन्नप्रसाद पाकिटांचे वितरण करण्यात आले. दर्शन रांगेतील १ लाख ६५ हजार २०० भाविकांना मोफत बुंदी प्रसादाचे पाकीट देण्यात आले. सशुल्क प्रसादरूपी लाडू विक्रीतून संस्थानला ₹७१ लाख ७ हजार ३६० रुपयांचे उत्पन्न मिळाले.


गुरुपौर्णिमा उत्सवादरम्यान साईप्रसाद निवासस्थान, साईबाबा भक्तनिवास, द्वारावती, साई आश्रम, साईधर्मशाळा तसेच अतिरिक्त उभारण्यात आलेल्या निवास मंडपांमध्ये हजारो भाविकांनी मुक्काम केला. विशेष म्हणजे, साईधर्मशाळेत देशभरातून आलेल्या ३९ पालख्यांतील पदयात्री साईभक्तांचीही निवास व्यवस्था करण्यात आली, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
यंदाच्या गुरुपौर्णिमा उत्सवाने पुन्हा एकदा साईभक्तांची श्री साईबाबांवरील अखंड श्रद्धा, विश्वास आणि समर्पण अधोरेखित केले असून, देणगी, दर्शन आणि सेवाकार्यातील उत्स्फूर्त सहभागामुळे शिर्डी भक्ती, सेवा आणि श्रद्धेचे जागतिक केंद्र असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button