Letest News
नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका...
क्राईमशिर्डी

शिर्डीच्या पार्किंगमधून भरदिवसा रॉयल एनफिल्ड चोरी शहरात खळबळ शिर्डीत चोरांचा धुमाकूळ

शिर्डी येथील हॉटेल साई आशिष  प्रायव्हेट लिमिटेड ह्या पार्किंग परिसरातून अज्ञात चोरट्याने रॉयल एनफिल्ड क्लासिक कंपनीची मोटारसायकल चोरून नेल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या चोरीमुळे शिर्डी शहरातील वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


फिर्यादी आशिष (वय ३७, रा. चांदे, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर) यांनी शिर्डी येथील पार्किंगमध्ये आपली निळ्या रंगाची रॉयल एनफिल्ड क्लासिक मोटारसायकल (क्रमांक MH-17 CW 4035) उभी केली होती. दि. 28 ते 29 जानेवारी 2026 दरम्यान अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने ही दुचाकी चोरून नेली. चोरी गेलेल्या मोटारसायकलची किंमत सुमारे १ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.


या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रभारी पोलीस निरीक्षक गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गोसावी पुढील तपास करत आहेत. शिर्डीतील पार्किंग परिसरात वारंवार चोरीच्या घटना घडत असल्याने पोलीस बंदोबस्त आणि सीसीटीव्ही यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
भरदिवसा दुचाकी चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button