Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
राजकीयशिर्डी

शिर्डीच्या मातीशी नाळ जपणारे सामाजिक कार्यकर्ते नितीन गोंदकर यांचा वाढदिवस उत्साहात

शिर्डीच्या मातीशी नाळ जपणारे सामाजिक कार्यकर्ते नितीन गोंदकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
शिर्डी ही केवळ तीर्थक्षेत्र नाही, तर माणुसकी जपणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची भूमी आहे. अशाच शिर्डीच्या मातीशी घट्ट नाळ जपणारे, सर्वसामान्यांच्या मनात आपुलकी निर्माण करणारे आणि समाजासाठी निस्वार्थ भावनेने झटणारे सामाजिक कार्यकर्ते नितीन गोंदकर यांचा वाढदिवस शिर्डी शहरात आपुलकीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


नितीन गोंदकर हे शिर्डीचे भूमिपुत्र असून सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. मितभाषी स्वभाव, हसरा चेहरा, संयमी आणि शांत वृत्ती ही त्यांची खरी ओळख आहे. कोणाशीही बोलताना समोरच्याच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची ते नेहमी काळजी घेतात. सुख असो वा दुःख, कुणाच्याही हाकेला न चुकता धावून जाणारा मित्र, आधार आणि आपला माणूस म्हणून ते ओळखले जातात.


कधीही गर्व न करता, साधेपणाने वागणारे नितीन गोंदकर हे मैत्रीसाठी जिवाला जीव देणारे व्यक्तिमत्त्व आहेत. गरजू, गोर-गरिब, निराधार व्यक्तींसाठी मदतीचा हात पुढे करण्यास ते कधीही मागेपुढे पाहत नाहीत. अनेकांच्या जीवनात त्यांनी दिलासा, आधार आणि नवी आशा निर्माण केली आहे.


त्यांच्या या समाजाभिमुख कार्याची दखल घेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्डीतील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि नागरिकांनी त्यांना शुभेच्छा देत सन्मान केला. हा वाढदिवस केवळ आनंदाचा दिवस न राहता, समाजसेवेच्या प्रेरणादायी प्रवासाचा सन्मान ठरला.


दैनिक साई दर्शन परिवाराच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते नितीन गोंदकर यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या हातून असेच निस्वार्थ सामाजिक कार्य घडो आणि त्यांच्या आयुष्यात आरोग्य, यश व समाधान लाभो, हीच सदिच्छा.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button