Letest News
श्रीरामपूरात खळबळ! अल्पवयीन मुलीचे अपहरण-अत्याचार आरोपी सोनू बेगच्या अडचणीत मोठी भर २० हजारांचा सौदा'! संगमनेरच्या तांबे हॉस्पिटलवर ACB चा गुन्हा मॅनेजरसह दोघे जाळ्यात ऊर्जा बचतीचा संदेश देत श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी अल्पवयीनेचे अपहरण करून बलात्कार आरोपीला नैसर्गिक मृत्यूपर्यंत सश्रम कारावास! शिर्डी दर्शनावरून परतणाऱ्यांवर थरारक दरोडा अपहरण करणाऱ्या टोळीतील ५ जण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्य... शिर्डी हादरवणाऱ्या हत्येतील आरोपी महिलांना कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी साईनगरीत रक्तरंजित थरार! मंदिराच्या गेट क्रमांक ४ समोर महिलेचा निर्घृण खून- जागेच्या वादातून दोन तरु... बँकेच्या 2.11 कोटींच्या थकबाकीवरून शिर्डीत हॉटेलवर कारवाई-ताबा घेण्यास विरोध-चार महिलांविरुद्ध शिर्ड... साईबाबांच्या चरणी विधानपरिषद अध्यक्ष राम शिंदे समाधी दर्शनानंतर संस्थानकडून सत्कार "निष्ठावान कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये-भाजप सदैव त्यांच्या पाठीशी उभा आहे" – विधानपरिषदेचे सभापती प...
राजकीयशिर्डी

मुसळधार पावसाचा रेड अलर्ट-नदीकाठच्या गावांनी तातडीने सतर्क राहावे!

अहिल्यानगर | प्रतिनिधी
भारतीय हवामान विभागाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने संपूर्ण जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होण्याची शक्यता असून, परिस्थितीनुसार धरणांमधून पाण्याचा विसर्ग करावा लागू शकतो. त्यामुळे प्रवरा नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
सध्या जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस सुरू असून धरणांमध्ये वेगाने पाणीसाठा वाढत आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह अचानक वाढू शकतो. नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांनी कोणतीही जोखीम न घेता सुरक्षित ठिकाणी राहावे आणि प्रशासनाच्या प्रत्येक सूचनेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांनी सांगितले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


प्रशासनाने महसूल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि पाटबंधारे विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. पूरस्थिती निर्माण झाल्यास तातडीने मदतकार्य सुरू करता यावे यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
नागरिकांनी घ्यावयाची महत्त्वाची खबरदारी
नदी, ओढे, नाले, पूल, बंधारे आणि पुराच्या पाण्याजवळ जाणे टाळावे.
धरणातून पाणी सोडण्याबाबत प्रशासनाकडून सूचना मिळाल्यास त्याचे तात्काळ पालन करावे.
नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे, औषधे आणि अत्यावश्यक वस्तू सुरक्षित ठेवाव्यात.
लहान मुले, वृद्ध आणि जनावरे यांना नदीकाठी किंवा पुराच्या पाण्याजवळ जाऊ देऊ नये.
अफवांवर विश्वास ठेवू नये; केवळ जिल्हा प्रशासन, हवामान विभाग आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा.


वीज पडत असताना झाडाखाली किंवा उघड्या जागेत थांबू नये.
आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत, पोलीस किंवा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी त्वरित संपर्क साधावा.
पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे की, हवामानातील बदल लक्षात घेऊन धरणांतील पाणीसाठा आणि नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहावर चोवीस तास लक्ष ठेवण्यात येत आहे. परिस्थितीनुसार आवश्यक निर्णय घेतले जातील. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, प्रशासनाला सहकार्य करावे आणि स्वतःची तसेच कुटुंबाची सुरक्षितता सर्वप्रथम प्राधान्याने जपावी.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button