Letest News
नागवाणीने लोकचंदानीला धोपटले शिर्डीत हॉटेल समोर राडा! मेव्हण्याकडून शिवीगाळ दाजीला मारहाण शिर्डीच्या मुखदर्शन हॉलमध्ये गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लंपास! गोकुळाष्टमीच्या पावन पर्वावर साईचरणी सोन्याचा भक्तिभाव!झारखंडच्या साईभक्ताकडून २० ग्रॅम वजनाचा आकर्ष... विखेंचा ‘डाव’ जरांगेंनी उघड केला? “आम्हाला मूर्खात काढण्याचे काम सुरू” जरांगेंच्या आरोपांनी राजकीय व... दाल में कुछ काला नहीं… पूरी दाल ही काली दिख रही है! दया साई संगम डिलक्स हॉटेलच्या चोरीत कुछ तो गडबड ... वडिलांची प्रकृती गंभीर तरी १५०० भाविकांची जबाबदारी खांद्यावर! ‘मंत्रीपद सेवेचे, गुंडगिरीचे नाही!’ मंत्र्यांनी मुलाला आवर घालावा- डॉ. राजेंद्र पिपाडांचा इशारा साफसफाई करताना सापडले ६.५ ग्रॅमचे सोन्याचे गंठण- साई कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणे केले संस्थानकडे जमा!र... ‘गोविंदा रे गोपाळा’च्या गजराने दुमदुमणार शिर्डी साई समाधी मंदिरात दोन दिवस विविध कार्यक्रम रील बनवा… टॅलेंट दाखवा… अन् जिंका तब्बल ५५५५ रुपयांचे प्रथम पारितोषिक!विकास गोंदकर पा. मित्र मंडळ व ...
Blog

मंदिर लोकार्पण सोहळ्याला जाणार नाही? उद्धव ठाकरे

मुंबई : मानधनवाढीच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविका चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येनं अंगणवाडी सेविका) आझाद मैदानावर जमल्या आहेत. मात्र या सेविकांनी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानावरून थेट बीएमसी आणि सीएसएमटी समोरच्या रस्त्यावर कुच करत काही काळ ठिय्या मांडला. त्यामुळे काही काळ या रस्त्यांवरील वाहतुकीची चांगलीच कोंडी झाली. अचानक रस्त्यावर उतरल्यामुळे पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांनीही थेट आझाद मैदानात येत या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. कोरोनाचं संकट टळलं आणि त्यानंतर माझं ऑपरेशन झालं त्यातून बाहेर येत नाही तोपर्यंत ह्यांनी गद्दारी करून सरकार पाडलं. पण सरकार पाडलं नसतं तर तुम्हाला आंदोलनासाठी इथे यावं लागलं नसतं हा माझा तुम्हाला शब्द आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

टाळ्यांसाठी हात वाजले तर एवढा आवाज होतो सरकारच्या कानाखाली हे हात आपटले तर किती आवाज होईल? घराघरात कोरोनाचा रुग्ण शोधणं, त्याला औषध देणं हे काम तुम्ही करत होता. डिसेंबरपासून तुम्ही मागणी करत आहात सरकारने ऐकलं का तुमचं? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. नवरा म्हणजे काय सरकार आहे न ऐकायला. तुझं सरकार राहील का? असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला. खेकडे खाऊन आरोग्य मंत्री सुदृढ झालेत, मात्र बालकं कुपोषित आहेत. महिला माता कुपोषित आहेत. गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी तुम्ही करता. ग्रामीण भागात आयुष्याचा पहिला श्रीगणेशा तुमच्या शाळेत होतो. तुम्ही पिढी घडवण्याचं काम करत आहात आणि सरकारकडे तुम्हाला द्यायला पैसे नाहीत, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.

येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नसल्याचे संकेत त्यांनीच त्यांनीच दिलेत. रामलल्लाच्या दर्शनासाठी कुणाच्या आमंत्रणाची गरज नाही… जेव्हा मनात येईल तेव्हा अयोध्येला जाईन, असं उद्धव ठाकरेंनी अंगणवाडी सेविकांच्या सभेत बोलताना सांगितलं. राममंदिर कुणा पक्षाची खासगी प्रॉपर्टी नाही, असंही त्यांनी ठणकावलं. उद्धव ठाकरेंना अयोध्येतील राममंदिर सोहळ्याचं आमंत्रण कुरिअरनं पाठवण्यात आल्याचं समजतंय.

kamlakar

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button