Letest News
साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा ‘लाचखोरीचा स्फोट!’ — शिर्डीचे प्रांत सीताराम गायकर यांचे जावई लाचखोर गोविंद शिंदे यास दिवस पोलीस कोठ... ‘रॉकेल आहे… पण स्टोव्ह नाही!’ शिर्डीत नागरिकांची अक्षरशः कोंडी लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम
क्राईमशिर्डी

अनाधिकृत डिजिटल बोर्ड लावून शिर्डी विद्रुपीकरण करणा-या लोकांवर कठोर कारवाईमुख्याधिकारी सतिश दिघे

शिर्डी ( प्रतिनिधी )-शिर्डी शहरात सार्वजनिक रस्त्यावर मालमत्तांवर झेंडे, पोस्टर, बॅनर्स, दहावे तेरावे दशक्रिया आभिनदन निवड श्रध्दांजली पुण्यस्मरण अशी होर्डिंग्ज दिसून येतात फोटो लावू नये तसेच नगरपरिषद हद्दीतील रस्ते चौक सार्वजनिक जागा यांचे परस्पर नामकरण करू नये अन्यथा या विरोधात सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायद्यान्वये तसेच माननीय सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचे आदेशाचे अवमान झाले प्रकरणी कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी दिला आहे.
शिर्डी शहरात अनधिकृतपणे लावले जाणारे झेंडे, पोस्टर्स, बॅनर, होर्डिंग्ज यासंदर्भात मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच विविध मंडळे यांचे माहितीस्तव पत्रक जारी केले असून यामध्ये म्हटले आहे की, शिर्डी शहरात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच शहरातील विविध मंडळे सार्वजनिक मालमत्तांवर अनधिकृतपणे झेंडे, पोस्टर्स, बॅनर, होर्डिंग्ज, फोटो, लावत असल्याचे नगरपालिका प्रशासनाचे निदर्शनास आले आहे. तसेच अनेक चौक, रस्ते, सार्वजनिक जागा यांचे नामकरण देखील परस्पर होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. हे कृत्य नियमबाह्य व बेकायदेशीर आहे. सार्वजनिक जागांना अनधिकृतपणे नाव देणे हे सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा १९९५ चे कलम ३ अन्वये गंभीर गुन्हा आहे. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांनी देखील कारवाई करणे बाबत निर्देश दिले असून सदर कारवाईवर न्यायालय लक्ष ठेवून असते. त्याबाबत आढावा सुद्धा न्यायालय घेत असते. कायदेशीर बाबींचे तसेच न्यायालयाचे आदेशाचे उल्लंघन होऊ नये म्हणून शहरातील सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी तसेच विविध संघटना व मंडळे यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी याबाबत विशेष खबरदारी घ्यावी. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून बेकायदेशीर केलेल्या कृतीमुळे संबंधित राजकीय पक्षाद्वारेच असे कृत्य केले बाबतचा संदेश जातो. त्यामुळे असा चुकीचा संदेश जाऊ नये, तसेच कायद्याचे उल्लंघन होऊ नये म्हणून अनधिकृत व बेकायदेशीरपणे झेंडे, पोस्टर्स, बॅनर, होर्डिंग्ज फोटो लावू नये अगर कुठल्याही रस्त्यांचे चौकाचे सार्वजनिक जागांचे परस्पर नामकरण करू नये. अन्यथा नगरपरिषद प्रशासनाला नाईलास्तव सार्वजनिक मालमत्ता विद्रूपीकरण प्रतिबंधक कायदा १९९५ अन्वये तसेच माननीय सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या आदेशाचे अवमान झाले प्रकरणी संबंधितावर कारवाई करावी लागेल याची सर्वांनी नोंद घ्यावी.असे आवाहन मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी केले आहे. या प्रश्नाकडे अमृत गायके यांनी शिर्डी नगर परिषद चे लक्ष वेधले होते

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button