Letest News
मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी!
Blog

मिञानेच केला मिञाचा खून,दीड महिन्यानंतर पोलिसांनी केली राहात्यातील गुन्ह्याची यशस्वी उकल

राहता शहरात धक्कादायक खुनाची उकल झाली असून शहरातील गौरव पंडित शिरसाठ वय ३० वर्ष ह्या मिसिंग असलेल्या तरुणाच्या मित्रानेच लाकडी दांडक्याने मारहाण करुन व गळा दाबून शिरसाठ याचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने प्रेत उसाचे शेतात टाकल्याची घटना पोलिसांनी उघडकीस आणली आहे याप्रकरणी मयत शिरसाठ याचा मित्र आरोपी किरण बबन मोरे याला पोलिसांनी जेरबंद केले आहे .

sai nirman
जाहिरात
   याबाबतचे वृत्त असे की गौरव पंडित शिरसाट (वय ३०  वर्ष रा. साई समर्थनगर राहाता ) हा दि १० नोव्हेंबर २०२३ पासून मिसिंग होता त्याबाबत वडील पंडित पुंजाजी शिरसाठ यांनी दि १३ नोव्हेंबर  रोजी तो मिसिंग असल्याची खबर राहाता पोलीस स्टेशनला दिली होती. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी व पोलीस कॉन्स्टेबल मालनकर यांनी तपास सुरू केला होता. दरम्यान मिसिंग व्यक्ती शिरसाठ याचा मित्र किरण मोरे हा सुद्धा १४ नोव्हेंबर  पासून घरी नसल्याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी व पोलीस कॉन्स्टेबल मालकर व पथकाने तांत्रिक विश्लेषण करीत गोपनीय बातमीदार यांच्या कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गतीने तपास सुरू केला. त्यावेळी सदर मिसिंग व्यक्तीसोबत घातपात झालेला असावा अशी शक्यता वाटली व तसा संशय पोलिसांना निर्माण झाला .

त्यामध्ये संशयित आरोपी किरण बबन मोरे हा घटना घडलेल्या दिवसापासून मिसिंग होता .पोलीस वेळोवेळी त्याचं मोबाईल लोकेशन काढत होती बराच काळ आरोपी राज्याच्या बाहेर होता .त्यानंतर दि २८ डिसेंबर रोजी पोलिसांनी आरोपी मोरे यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता आरोपी मोरे याने मिसिंग व्यक्ती गौरव पंडित शिरसाठ याचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे प्रेत हे इरिगेशन बंगल्याच्या पाठीमागे शेतात फेकल्याचे पोलिसांना सांगितले त्यानंतर पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन पंचनामा करून प्रेत ताब्यात घेतले मृतदेह कुजलेला असल्याने जागेवरतीच शवविच्छेदन करण्यात आले.

DN SPORTS

याप्रकरणी राहाता पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ६६५/ २०२४ भादवि कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा नोंद झाला असून या खुनाचे गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सूचनेप्रमाणे व श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांचे निर्देशानुसार शिर्डी उपविभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके व राहाता पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रभाकर शिरसाट पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधाकर काळोखे पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक झिने पोलीस नाईक नरोडे व पोलीस कॉन्स्टेबल मालनकर यांनी केलेला आहे

kamlakar

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button