Letest News
ड्रग्स स्फोटाने राजकारण पेटलं-सुजय विखेंचं पोलिसांना अल्टिमेटम “गुंड दीपक पोकळेच्या कार्यालयाचे उद्घ... “शिर्डीत पोलिसांचा रौद्रावतार-वेश्या व्यवसाय करणार्‍या गुन्हेगारांवर कायद्याची वज्रकाठी पीटा अंतर्गत... सिंहस्थ कुंभमेळा : शिर्डीच्या विकासाला सुवर्णसंधी कुंभमेळ्याच्या निमित्ताने शिर्डीत विकासाचा महायज्ञ झाडू ते चेअरमन – संघर्षाला सन्मान देणाऱ्या नेतृत्वाला ‘दैनिक साईदर्शन’ कडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक श... नशेच्या इंजेक्शन विक्रीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेचा छापा ११-६१३ रुपयांचा मुद्देमाल जप्त-एकास अट... अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर मोक्का-म्पीडीएचा बडगा संगमनेर दौऱ्यात डॉ. पंकज आशियांचे कडक आदेश अखेरचा भगवा सलाम! शिर्डी शहर शिवसेनेचा निष्ठावंत शिलेदार सुनीलभाऊ परदेशी यांचे निधन टाटा मोटर्सचा उदार हात! २५.६९ लाख रुपयांची टाटा सिएरा श्री साईबाबा संस्थानकडे सुपूर्द शिर्डी पोलीस स्टेशनने ‘दैनिक साई दर्शन’च्या बातमीची घेतली दखल सुगंधित तंबाखू विक्रीप्रकरणी छापा- ४-९... भाच्यानेच केला मामाचा खून! स्थानिक गुन्हे शाखेची 15 दिवसांच्या तपासानंतर उकल
अ.नगरक्राईम

कोपरगाव येथील अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग केंद्रावर छाप

( शिर्डी प्रतिनिधि)
शिर्डी विभागाचे पोलिस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांना गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली की कोपरगाव येथील साईकॉर्नर जवळ नगरपालिकेच्या गाळ्यामध्ये साईगंगा मोटर गॅरेज मध्ये मनोज गिरमे हा इसम चार चाकी वाहनांमध्ये अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग करत आहे . अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने कोपरगाव येथील तहसीलदार यांना कळवून संयुक्त कारवाई करण्याकरिता माहिती दिली असता त्यांनी तहसील कार्यालय येथील पुरवठा निरीक्षक महादेव कुंभारे यांना संयुक्त कारवाई करण्याकरता पाठवले त्यावर सदर ठिकाणी पथकातील पोलीस अमलदार पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन दोन चार चाकी वाहनांसह गॅस सिलेंडर भरण्याचे रिफिलिंग मशीन व 19 घरगुती गॅस टाक्या तसेच 2 कमर्शियल गॅस टाक्या जप्त करण्यात आले आहेत तसेच 1) मनोज चंद्रकांत गिरमे वय 43 रा. खडकी रोड तालुका कोपरगाव 2) अल्ताफ बाबू शेख – वय 48 रा. मनमाड ता. नांदगाव जि. नाशिक या आरोपिंना ताब्यात घेण्यात आले. आरोपींच्या ताब्यातून चार चाकी वाहने , गॅस टाक्या, मशीन असा एकूण 4,66,140 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 कलम 3,7 आणि भारतीय दंड संहिता 1860 कलम 285 अंतर्गत पोलीस हेडकॉन्स्टेबल इरफान शेख यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या कारवाईमुळे कोपरगाव तालुका परिसरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.
सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर स्वाती भोर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके , पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख, पोलिस उपनिरीक्षक भरत दाते पुरवठा निरीक्षक महादेव कुंभारे, इरफान शेख, अशोक शिंदे, श्याम जाधव, गणेश काकडे , तावरे, ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी केली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button