Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
राजकीयशिर्डी

शिर्डीत ३२ व्या श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याची तयारी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात

शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डीतील साईभक्तांसाठी आनंदाची बातमी असून, श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी आणि नाट्य रसिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच शिर्डी ग्रामस्थांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणाऱ्या ३२ व्या श्री साईसच्चरित पारायण सोहळा – २०२६ साठी अधिकृत संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. यावर्षी हा पारायण सोहळा १३ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे.
या सोहळ्यात देश-विदेशातून हजारो साईभक्त सहभागी होऊन श्री साईसच्चरिताचे सामूहिक पारायण करतात. गेली ३२ वर्षे अखंड सुरू असलेल्या या आध्यात्मिक परंपरेमुळे शिर्डीतील पारायण सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

भक्तांना नियोजनबद्ध पद्धतीने सहभागी होता यावे यासाठी यंदा ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पारायण सेवेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या साईभक्तांनी www.saiparayan.org⁠� या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुकांनी लवकरात लवकर आपले नाव नोंदवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आयोजकांनी सर्व साईभक्तांना या पवित्र पारायण सेवेत सहभागी होण्याचे तसेच ही माहिती आपल्या नातेवाईक, मित्रपरिवार आणि साईभक्तांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले आहे. श्रावण महिन्यात होणारा हा पारायण सोहळा भक्ती, श्रद्धा आणि साईनामाच्या अखंड गजराने शिर्डी नगरीला आध्यात्मिक उत्साहाने भारून टाकणार आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button