Letest News
नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका...
अ.नगरक्राईम

ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात!

जामखेड | प्रतिनिधी :ग्रामपंचायत कार्यालयातील जन्म-मृत्यू नोंदवहीतील माहिती देण्यासाठी तब्बल १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि. ११ ऑगस्ट) जामखेड येथील हॉटेल महाभगवती येथे करण्यात आली.

sai nirman
जाहिरात

महादेव मल्हारी ढाकणे (वय ५३), ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत जातेगाव, ता. जामखेड, असे कारवाई झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. या कारवाईमुळे जामखेड तालुक्यातील ग्रामपंचायत प्रशासनात खळबळ उडाली आहे.

DN SPORTS

kamlakar

जन्म-मृत्यू नोंदवहीतील माहिती हवी होती

ACBच्या माहितीनुसार, ५१ वर्षीय शेतकरी तक्रारदाराने दि. ११ ऑगस्ट रोजी जातेगाव ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्याशी फोनवरून संपर्क साधला होता. सन १९८८ मधील ग्रामपंचायत जातेगावच्या जन्म-मृत्यू नोंदवहीमध्ये सरपंच, ग्रामपंचायत बोरखेडे, ता. जि. बीड यांच्या नावाने नोंद आहे किंवा नाही, तसेच त्यासंदर्भातील इतर माहिती मिळावी, अशी तक्रारदाराची मागणी होती.

माहिती देण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी ढाकणे यांनी “तुम्हाला जेवढे पैसे देता येतील तेवढे पैसे द्या,” अशी मागणी केल्याचे ACBच्या तक्रारीत नमूद आहे. तसेच संबंधित माहितीचा अर्ज समक्ष देण्यासही तक्रारदारास सांगण्यात आले

लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर येथे संपर्क साधून तक्रार केली.

पंचांसमक्ष १० हजारांची मागणी

तक्रारीची पडताळणी करण्यासाठी ACB पथकाने कारवाई केली. हॉटेल महाभगवती, जामखेड येथे झालेल्या पडताळणीदरम्यान ग्रामपंचायत अधिकारी ढाकणे यांनी तक्रारदाराकडे संबंधित माहिती देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले, अशी माहिती ACBने दिली आहे.

दरम्यान, तक्रारदाराने माहितीचा अर्ज संबंधित अधिकाऱ्याकडे दिला असून त्यावर पोहोचही घेतल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

५ हजार स्वीकारले; उर्वरित रकमेचेही आश्वासन

यानंतर ACBने सापळा रचला. हॉटेल महाभगवती येथे तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारताना ढाकणे यांना पकडण्यात आले.

तक्रारदाराकडे त्यावेळी उर्वरित ५ हजार रुपये नसल्याने फोन-पेच्या माध्यमातून उर्वरित रक्कम देण्याचे त्याने सांगितले. त्यास संबंधित अधिकाऱ्याने संमती दिल्याचे ACBच्या अहवालात नमूद आहे.

या कारवाईनंतर आरोपी ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले असून, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमातील कलम ७ अन्वये जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे ACBने स्पष्ट केले आहे.

पोलीस निरीक्षक सविता तांबे यांच्या पथकाची कारवाई

ही सापळा कारवाई पोलीस निरीक्षक सविता तांबे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पर्यवेक्षक अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांनी काम पाहिले.

सापळा पथकात पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत काळे, पोलीस कॉन्स्टेबल शेखर वाघ आणि चालक पोलीस हवालदार कारंडे यांचा समावेश होता.

या कारवाईसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांचे मार्गदर्शन लाभले.

‘लाच मागणाऱ्या लोकसेवकांची माहिती द्या’

भ्रष्टाचारासंबंधी माहिती अथवा लाच मागणाऱ्या कोणत्याही लोकसेवकाविरुद्ध तक्रार असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन ACBकडून करण्यात आले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हेल्पलाइन : १०६४अहिल्यानगर घटक कार्यालय : ०२४१-२४२३६७७

ग्रामपंचायतसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांना मिळणाऱ्या विविध दाखले, नोंदी आणि प्रशासकीय सेवांसाठी लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी गप्प न बसता थेट ACBकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button