शिर्डी (साई दर्शन न्यूज) – प्रसिद्ध भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते, निर्माते तसेच यशस्वी उद्योजक नागार्जुन यांनी आज श्री क्षेत्र शिर्डी येथे येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी श्रद्धा व भक्तिभाव व्यक्त केला.
दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी यांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांनी नागार्जुन यांचा शाल, श्रीफळ व श्री साईबाबांची प्रतिमा देऊन सन्मानपूर्वक सत्कार केला.
यावेळी नागार्जुन यांनी श्री साईबाबांच्या दर्शनाने मनाला शांती, समाधान व सकारात्मक ऊर्जा मिळाल्याची भावना व्यक्त केली. त्यांच्या या साईदर्शनामुळे मंदिर परिसरात उपस्थित भाविकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती.
प्रसिद्ध व्यक्तींच्या साईदर्शनामुळे शिर्डीतील भक्तिभाव अधिकच दृढ होत असून, साईनगरी पुन्हा एकदा श्रद्धा आणि विश्वासाचे केंद्र ठरत आहे.


