Letest News
शिर्डी गुटखा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? थेट लोकायुक्त- एसीबी आणि आयुक्तांकडे धडक-एफडीए अधिकाऱ्यांच्या... शिर्डीचा विकास थांबवणारे नेमके कोण? — ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बनकर यांचा परखड सवाल शिर्डीतील रिक्षा लूट प्रकरणाने उघडे पाडले गंभीर प्रश्न! शिर्डीत भाविकांची अडवणूक करणाऱ्यांवर पोलिसांचा दणका! शिर्डीत रिक्षातून वृद्धाची लूट सराईत गुन्हेगार रहीम पठाणसह दोघांना २ दिवसांची पोलीस कोठडी समता घोटाळा : व्यवस्थापकाला पोलीस कोठडी आता 'मोठ्या माश्या'वर कारवाई कधी? शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्...
अ.नगरराजकीय

आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी – निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके आचारसंहिता भरारी पथकांच्या आढावा

कोपरगाव, – भारत निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर २०२४ रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येकाने सोपविलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके यांनी आज दिले.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील निवडणूक आचारसंहिता भरारी पथकांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. याप्रसंगी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत, नायब तहसीलदार प्रफुल्लीता सातपुते व‌ आचारसंहिता कक्षाचे अधिकारी उपस्थित होते.

श्रीमती सोळंके म्हणाल्या की, एफएसटी (भरारी) पथकाने सी-व्हीजील (C-vigil) ॲप मोबाईलवर कार्यरत करून घ्यावे. आचारसंहितेच्या तक्रारीचे शंभर मिनीटांच्या आत निवारण करावे. एफएसटीच्या ६ पथके कार्यरत झाली आहेत. एसएसटी पथकांसाठी ३ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्यासाठी दिवसा ३ व रात्री ३ पथके चेक पोस्टसाठी कार्यान्वीत असतील. व्हीएसटी पथकांनी सर्व राजकीय सभांचे काटेकोरपणे व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे. खर्च पथकाने ही सूक्ष्म तपासणी करावी.

निवडणुककामी कोणत्याही पथक प्रमुखांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये अथवा रजेवर जावू नये असे निर्देशही श्रीमती सोळंके यांनी दिले. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांचे वाचन करून त्यानुसारच त्याची अंमलबजावणी करावी. कार्यालय व परिसरातील विकास कामांचे भूमिपूजन फलक, कोनशीला, राजकीय व्यक्तींची छायाचित्रे व पक्षाची चिन्हे असलेले बॅनर, होर्डिंग्ज तात्काळ काढण्यात यावे. रस्ते व सार्वजनिक जागेवर प्रचार साहित्य लागणार नाही याची दक्षता घ्यावी.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button