Letest News
“गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट... मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे द... राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४९४१९ इतकी प्रकरणे निकाली आणि साधारणतः ४९ कोटी रुपयांची तडजोड शिर्डी विकास सोसायटीत ‘एकाच खुर्ची’चा बादशहा! सचिव बडे यांच्याविरोधात सभासदांचा एल्गार सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस
अ.नगरक्राईम

प्रा.राम शिंदे यांच्या अहिल्यानगर दौऱ्याप्रसंगी सुरक्षा व राजशिष्टाचाराबाबत गंभीर त्रुटीसंदर्भात दोषी पोलीस निलंबित

महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या दिनांक २२ जून २०२५ रोजीच्या अहिल्यानगर शहरातील दौऱ्यादरम्यान गंभीर स्वरूपाच्या सुरक्षा व राजशिष्टाचाराबाबतच्या त्रुटी आढळून आल्याने कर्तव्यात कसूर केलेले पोकॉ/2580 भगवान रामदास वाघुले यांना पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी निलंबित केले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

अहिल्यानगर संलग्न जिल्हा विशेष शाखा, अहिल्यानगर परिक्षेत्राचे पोकॉ/2580 भगवान रामदास वाघुले यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या सावेडी, अहिल्यानगर येथील नियोजित दौऱ्यादरम्यान सुरक्षासेवेत कायदेशीर कर्तव्य पार न पाडल्याने व बेजबाबदार, बेशिस्त आणि हलगर्जीपणाचे वर्तन केल्याने शासन सेवेतून त्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कार्यक्रमाच्या ठिकाणी पुरेसा पोलिस बंदोबस्त न नेमल्याची तसेच स्थानिक पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी बंदोबस्तासाठी हजर नसल्याची बाब चौकशीअंती स्पष्ट झाली असता सदरील कसुरीबाबत चौकशी करण्यात आली. चौकशीअंती दोषी पोलिस पोकॉ/2580 भगवान रामदास वाघुले यांच्या विरुद्ध शिस्तभंग विषयक कडक कारवाई व निलंबनाचे आदेश अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांनी दिले आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button