Letest News
"छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष... रस्ता अडवल्याच्या कारणावरून रक्तरंजित हल्ला-बीअरच्या बाटल्यांनी दोघांना केले रक्तबंबाळ ३० दारू धंदे अभयात एकावरच कारवाई-मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशयाची सुई! मंदिर परिसरात कोयता फिरवत दहशत-शिर्डी पोलिसांची धडक कारवाई-तरुण गजाआड
Blog

बिंगो जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा! बिंगो जुगाराचे साहित्य व रोख रक्कम मिळून 43 हजार 930 रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त!

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथील धनगर गल्लीमध्ये बिंगो नावाचा हार जितीचा जुगार खेळताना व खेळवितांना राहता येथील एका तरुणावर 43 हजार 930 रुपये बिंगो जुगाराचे साहित्य व रोख रकमेसह मुद्देमाल जप्त करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

sai nirman
जाहिरात

यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने शिर्डी येथील धनगर गल्लीमध्ये गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाल्यानंतर दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या बिंगो नावाचा हारजितीचा जुगार खेळताना व खेळवितांना तेथे जाऊन छापा टाकला असता या छाप्यात जुगार खेळणारे पळून गेले .मात्र जुगार चालक अमित निशाद शहा राहणार राहता यास जागेवर पकडण्यात आले. त्याची संपूर्ण चौकशी केल्यानंतर त्याच्याकडील बिंगो नावाच्या जुगारातील रोख रक्कम व इतर साहित्य असे मिळून 43 हजार 930 रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

DN SPORTS

या बिंगो जुगार चालकांवर शिर्डी पोलीस ठाण्यात मुंबई जुगार प्रतिबंध अधिनियम कायदा 12अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .अधिक तपास शिर्डीचे पोलीस निरीक्षक सोपानराव शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करत आहेत.
सध्या शिर्डी व परिसरामध्ये बिंगो नावाचा जुगार मोठ्या प्रमाणात खेळला जात असून त्यातून मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. अनेक तरुण पिढी या बिंगो जुगारात गुंतली असून त्यामुळे अनेकांचे घर बरबाद झाले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली आता ठीक ठिकाणी बिंगो जुगारावर छापे टाकण्यात येत आहेत. काही दिवसापूर्वी राहता येथेही चार-पाच ठिकाणी बिंगो जुगारावर छापे टाकून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिर्डी सह परिसरात बिंगो जुगार सुरू असून गुपचूप पणे चालणारे हे बिंगो नावाचे जुगार यांच्यावरही छापे टाकून हा बिंगो जुगार कायमस्वरूपी बंद करण्यात यावा अशी मागणी आता ग्रामस्थांकडून होत आहे व बिंगो जुगारावर छापे टाकण्यात येत असल्यामुळे ग्रामस्थांमधूनही समाधान व्यक्त होत आहे.

kamlakar

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button