Letest News
“गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट... मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे द... राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४९४१९ इतकी प्रकरणे निकाली आणि साधारणतः ४९ कोटी रुपयांची तडजोड शिर्डी विकास सोसायटीत ‘एकाच खुर्ची’चा बादशहा! सचिव बडे यांच्याविरोधात सभासदांचा एल्गार सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस
अ.नगरक्राईम

आरोपी करू नका-अटक टाळतो- पोलीस उपनिरीक्षकासह तिघांविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा

नाशिक/येवला : येवला तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात तक्रारदाराच्या भावाला आरोपी न करण्यासाठी व अटक न करण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी केल्याप्रकरणी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षकासह तिघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणातील लोकसेवक आरोपी हर्षवर्धन दिलीप बहीर, तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक, येवला तालुका पोलीस ठाणे (सध्या श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे, जि. अहिल्यानगर) आहेत. तसेच सुनिल शिवाजी बोराडे (रा. पाटोदा, ता. येवला) आणि जगदीश तुकाराम बोराडे या दोघा खासगी व्यक्तींविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या भावाला गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी व अटक टाळण्याच्या बदल्यात सुरुवातीला ₹४ लाखांची लाच मागण्यात आली. तडजोडीनंतर ही रक्कम ₹२ लाख ५० हजार इतकी निश्चित करण्यात आली. त्यापैकी ₹५० हजारांची रक्कम सुनिल बोराडे याने फोन-पेद्वारे स्वीकारल्याचा आरोप आहे.
तसेच, ही लाचेची रक्कम पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी जगदीश बोराडे याने तक्रारदाराला प्रोत्साहन दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे एसीबीने म्हटले आहे.
या प्रकरणाची पडताळणी तत्कालीन पोलीस निरीक्षक पूनम केदार यांनी केली. पोलीस निरीक्षक योगेश भास्कर शिंदे यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल कुमार नाईक करीत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button